ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात रत्नागिरीचे प्रथमेश गवाणकर उच्च न्यायालयात; कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात रत्नागिरीचे प्रथमेश गवाणकर उच्च न्यायालयात; कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल
रत्नागिरी

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात रत्नागिरीचे प्रथमेश गवाणकर उच्च न्यायालयात; कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल

Gramin Varta
Last updated: September 25, 2026 8:26 am
Gramin Varta
38 Views
Share

रत्नागिरी: केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये एक महत्त्वपूर्ण याचिका दाखल करण्यात आली आहे. रत्नागिरी येथील प्रथमेश गवाणकर यांनी प्रख्यात विधिज्ञ ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत ही याचिका दाखल करून निवडणूक आयोगाच्या कारभाराला कायदेशीर आव्हान दिले आहे.

या याचिकेत मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. निवडणूक आयोगातील १४ महत्त्वपूर्ण निर्णयांवर उर्वरित दोन निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट आक्षेप नोंदवले असतानाही, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे आवश्यक वैधानिक व कायदेशीर प्रक्रियेचे थेट उल्लंघन झाल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.

या याचिकेद्वारे न्यायालयात प्रमुख दोन मागण्या करण्यात आल्या आहेत: १. संपूर्ण राज्यात सुरू असलेली वादग्रस्त ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रिया तातडीने थांबवण्यात यावी. २. या सदोष प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून अन्यायकारकपणे वगळण्यात आलेल्या सर्व मतदारांची नावे तातडीने पुनर्स्थापित करण्यात यावीत.

मतदारांचे घटनादत्त हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या महत्त्वाच्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात लवकरच सुनावणी होण्याची शक्यता असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :

5427401
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

‘श्री रत्नागिरीचा राजा’च्या मंडपात हातसफाई; पूजेचे ४० हजारांचे चांदीचे ताम्हण लंपास

Gramin Varta
2 Min Read

रायगड- भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

लांजाच्या दिपराज-तीर्थाचा तायक्वॉंदोमध्ये दुहेरी सुवर्णवेध

Gramin Varta
2 Min Read

किल्ले रायगड रोपवे सेवा तात्पुरती ठप्प; प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

थिबापॅलेस परिसरात मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेने संशयित ताब्यात

2 Min Read
रत्नागिरी

अवैध मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर कारवाईचा बडगा; रत्नागिरीत मत्स्य विभागाची धडक कारवाई

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी: बाथरूममध्ये पाय घसरून पडलेल्या नाचणे येथील ८० वर्षीय वृद्धाचा उपचारापूर्वी मृत्यू

1 Min Read
रत्नागिरी

कळझोंडी उपकेंद्रात सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ६२ ग्रामस्थांनी घेतला लाभ

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?