ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लांजाच्या दिपराज-तीर्थाचा तायक्वॉंदोमध्ये दुहेरी सुवर्णवेध
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लांजाच्या दिपराज-तीर्थाचा तायक्वॉंदोमध्ये दुहेरी सुवर्णवेध
लांजा

लांजाच्या दिपराज-तीर्थाचा तायक्वॉंदोमध्ये दुहेरी सुवर्णवेध

Gramin Varta
Last updated: September 17, 2026 2:00 pm
Gramin Varta
27 Views
Share

जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत सुवर्णपदकावर मोहोर; कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड

लांजा : रत्नागिरी येथे १० व ११ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा तालुक्यातील दिपराज युवराज खानविलकर आणि तीर्था गणेश यादव यांनी दमदार कामगिरी करत आपल्या गटात सुवर्णपदक पटकावले. या यशामुळे दोन्ही खेळाडूंची १ व २ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर विभागात होणाऱ्या शालेय तायक्वॉंदो विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या सहकार्याने तसेच रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन, पंचायत समिती राजापूर संचलित राजापूर तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना आणि तायक्वॉंदो अकॅडमी, राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या जिल्हास्तरीय स्पर्धेत लांजा तालुक्यातून ३० खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यामध्ये दिपराज खानविलकर आणि तीर्था यादव यांनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

दिपराज खानविलकर हा न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज, लांजा येथे इयत्ता अकरावीत शिक्षण घेत आहे, तर तीर्था यादव ही डी. जे. सामंत स्कूल, लांजा येथे शिक्षण घेत आहे. शालेय शिक्षणासोबत तायक्वॉंदोचा नियमित सराव करत या दोन्ही खेळाडूंनी जिल्हास्तरावर आपल्या क्रीडा कौशल्याची छाप उमटवली.

या स्पर्धेत लांजा तालुक्यातील राष्ट्रीय पंच शितल विरेंद्र आचरेकर यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली.

दिपराज आणि तीर्था यांच्या या यशामुळे आता त्यांच्यासमोर कोल्हापूर विभागीय स्पर्धेचे आव्हान असणार आहे. विभागीय स्तरावर लांजा तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

या यशाबद्दल तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी, लांजा, गुरुकुल तायक्वॉंदो स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमी, लांजा तसेच रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.

अकॅडमीचे अध्यक्ष किशोर यादव, उपाध्यक्ष अमोल रेडिज, सचिव व राष्ट्रीय पंच तथा प्रमुख प्रशिक्षिका तेजस्विनी आचरेकर, सहसचिव अनुजा कांबळे, सदस्य रोहित कांबळे व लक्ष्मण करारा तसेच प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच तेजस पावसकर, गौरव खेडेकर, गणेश तोंडारे, तेजस वडवलकर आणि स्वरूप शिंदे यांनी खेळाडूंचे कौतुक केले. क्रीडा शिक्षकांसह लांजावासीयांनीही दिपराज खानविलकर आणि तीर्था यादव यांचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

Unraveling the Complexities of the Human Mind and Behavior

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

‘जैतापूरचा राजा’ गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’; महिला शेतकरी सन्मान योजनेसह शासकीय योजनांचे मार्गदर्शन

Gramin Varta
2 Min Read

महाराष्ट्राची कन्या स्वीडनच्या संसदेत; कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी नीला विखे पाटील खासदारपदी

Gramin Varta
2 Min Read

दाभोळे महसूल सेवकाविरोधातील उपोषण स्थगित; चौकशीचे प्रशासनाकडून लेखी आश्वासन

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

लांजा

लांजा शहरासह तालुक्यात गणरायाचे वाजतगाजत आगमन; भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाला सुरुवात

1 Min Read
लांजा

मजुराला धडक देऊन पसार झालेला चालक पाचलमधून जेरबंद; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लांजा पोलीस पथकाचा सन्मान

2 Min Read
लांजा

लांजातील उद्योजक शिवाजी कोत्रे यांच्याकडून घरातच पर्यावरणपुरक पध्दतीने श्रींचे भावपूर्ण विसर्जन

1 Min Read
लांजा

एकल महिलांच्या सर्वेक्षणाला १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?