रत्नागिरी : नाचणे येथील वसंत वर्षा इमारतीत राहणाऱ्या ८० वर्षीय वृद्धाचा बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारानंतर घरी परतल्यानंतर पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
वसंत धर्माजी झगडे (वय ८०, रा. घर नं. १७९१, पांडवनगर, नाचणे, ता. जि. रत्नागिरी) हे राहत्या घरी बाथरूमला जात असताना पाय घसरून पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
२१ सप्टेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र त्याच दिवशी रात्री सुमारे ७.४५ वाजता ते पुन्हा बेशुद्ध झाल्याचे केअरटेकर रूपेश खेडेकर यांनी सांगितले.
त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून पुन्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता रात्री १०.०९ वाजता त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ११६/२०२६, बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे.
रत्नागिरी: बाथरूममध्ये पाय घसरून पडलेल्या नाचणे येथील ८० वर्षीय वृद्धाचा उपचारापूर्वी मृत्यू
Leave a Comment





