ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीच्या रुद्र महालेचा जागतिक स्तरावर ऐतिहासिक पराक्रम; १०० मीटर बॅकवर्ड स्केटिंगमध्ये नोंदवले ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीच्या रुद्र महालेचा जागतिक स्तरावर ऐतिहासिक पराक्रम; १०० मीटर बॅकवर्ड स्केटिंगमध्ये नोंदवले ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’
रत्नागिरी

रत्नागिरीच्या रुद्र महालेचा जागतिक स्तरावर ऐतिहासिक पराक्रम; १०० मीटर बॅकवर्ड स्केटिंगमध्ये नोंदवले ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

Gramin Varta
Last updated: October 15, 2026 3:04 pm
Gramin Varta
27 Views
Share

रत्नागिरी : रत्नागिरीच्या मातीची शान आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावत मुंबईतील भांडुप येथे राहणारा प्रतिभावान बालक खेळाडू रुद्र विजय महाले याने क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास रचत ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये आपल्या कर्तृत्वाची सुवर्ण मोहर उमटवली आहे. कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे ‘शिवागंगा आर. एस. सी. (इंडिया)’ यांच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या अत्यंत चुरशीच्या व थरारक स्पर्धेत रुद्रने इनलाईन स्केट्सवर मागे चालत (बॅकवर्ड स्केटिंग) १०० मीटरचे अंतर अवघ्या १७.९३ सेकंदांत लीलया पार करण्याचा अंगावर काटा आणणारा पराक्रम करून दाखवला. लहान वयातच दाखवलेल्या या थक्क करणाऱ्या कामगिरीबद्दल रुद्रला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे मानाचे अधिकृत प्रमाणपत्र आणि पदक बहाल करण्यात आले असून, त्याच्या या देदिप्यमान यशामुळे रत्नागिरीकरांची मान जगभरात अभिमानाने उंचावली आहे.

रुद्रची नाळ कोकण आणि रत्नागिरीशी अत्यंत घट्ट जोडलेली असून तो रत्नागिरीतील निवृत्त पोलीस निरीक्षक अशोक विष्णू चव्हाण यांचा नातू आहे. त्याची आई सौ. संपदा अशोक चव्हाण (महाले) या रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी असून महाविद्यालयात असताना त्यांनी कला आणि क्रीडा क्षेत्रात मिळवलेला वारसा रुद्रला लाभला आहे. रुद्रचे वडील विजय महाले हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मध्ये टेक्निकल लीड म्हणून कार्यरत आहेत, तर आई संपदा महाले महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून सेवा बजावत आहेत. अत्यंत कठोर मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेत रत्नागिरीचे नाव जागतिक नकाशावर कोरणाऱ्या या बालचमुवर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असून भविष्यातही त्याने क्रीडा जगतात अशीच उत्तुंग भरारी घ्यावी, अशा सदिच्छा मित्रपरिवार, क्रीडाप्रेमी आणि नातेवाइकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

Total Visitors :

5468408
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राज ठाकरेंकडून अदानींवरील डॉक्युमेंट्रीची पोस्ट डिलीट

Gramin Varta
4 Min Read

संगमेश्वर तालुक्यात अखेर थंडीची चाहूल; उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा तर आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

Gramin Varta
2 Min Read

‘आयुष्यात कधीच आंदोलनात सहभागी होणार नाही’; भारत छोडो नोटिशीवर अभिनेता इम्रान खानने कोर्टाची मागितली बिनशर्त माफी

Gramin Varta
3 Min Read

दि मॉडेल इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थिनी तथा चिपळूणच्या नगरसेविका नसरीन खडस यांना ‘आदर्श विद्या रत्न पुरस्कार’ प्रदान

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

कोकण रेल्वे मार्गाचे येत्या ५ वर्षांत दुपदरीकरण पूर्ण करणार; दररोज धावणार १०० हून अधिक गाड्या

2 Min Read
रत्नागिरी

हातखंबा तिठा-गाव मार्गावरील धोकादायक उतार ठरतोय अपघातांचा सापळा; गतिरोधकासह सुरक्षात्मक उपाययोजनांची मागणी

2 Min Read
रत्नागिरी

शिपाई पदाची भरती प्रक्रिया रखडली; अंतिम मुदतीनंतर ६८ दिवस उलटूनही नियुक्ती नाही

2 Min Read
रत्नागिरी

जयगड : दुचाकी कठड्याला धडकून दरीत कोसळली; अपघातात चालकाचा मृत्यू, दोन तरुण जखमी

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?