ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब योजनेसाठी नोव्हेंबरचा धान्य कोटा मंजूर; १० लाखांहून अधिक लाभार्थ्यांना मिळणार लाभ
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब योजनेसाठी नोव्हेंबरचा धान्य कोटा मंजूर; १० लाखांहून अधिक लाभार्थ्यांना मिळणार लाभ
रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब योजनेसाठी नोव्हेंबरचा धान्य कोटा मंजूर; १० लाखांहून अधिक लाभार्थ्यांना मिळणार लाभ

Gramin Varta
Last updated: October 21, 2026 3:36 pm
Gramin Varta
165 Views
Share

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत प्राधान्य कुटुंब योजनेतील (PHH) पात्र शिधापत्रिकाधारकांसाठी नोव्हेंबर २०२६ या महिन्याचा अन्नधान्य कोटा शासनाकडून मंजूर करण्यात आला असून, त्याबाबतचा अधिकृत वितरण आदेश जारी झाला आहे. या मंजुरीनुसार जिल्ह्यासाठी एकूण २ हजार ४१६ मेट्रिक टन तांदूळ आणि १ हजार ६३८.२५ मेट्रिक टन गहू उपलब्ध करून देण्यात आला असून, जिल्ह्यातील तब्बल १० लाख २ हजार ८०० नोंदणीकृत लाभार्थ्यांना याचा थेट लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी नितीन वाघ यांनी दिली आहे.

शासकीय निकष व नियमांनुसार प्रत्येक पात्र लाभार्थ्याला प्रतिमहिना ३ किलो तांदूळ आणि २ किलो गहू असे एकूण ५ किलो मोफत अन्नधान्य रास्त भाव दुकानांमार्फत वाटप केले जाणार आहे. तालुका व गोदामनिहाय विचार केल्यास मंडणगड गोदामांतर्गत ४० हजार ७१३ लाभार्थ्यांसाठी ७० मेट्रिक टन तांदूळ व ५५.५० मेट्रिक टन गहू, दापोलीतील १ लाख १८ हजार ८०१ लाभार्थ्यांसाठी २१० मेट्रिक टन तांदूळ व १५०.५० मेट्रिक टन गहू, खेडमधील १ लाख १३ हजार ६०२ लाभार्थ्यांसाठी ३२५ मेट्रिक टन तांदूळ व २१७ मेट्रिक टन गहू तर गुहागरमधील ७४ हजार ७५ लाभार्थ्यांसाठी १८० मेट्रिक टन तांदूळ व १२५.२५ मेट्रिक टन गव्हाचा कोटा मंजूर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे चिपळूण गोदामांतर्गत सर्वाधिक १ लाख ४९ हजार ५३८ लाभार्थ्यांसाठी ४११ मेट्रिक टन तांदूळ व २७६ मेट्रिक टन गहू वितरित केला जाईल. संगमेश्वरमधील ६८ हजार ८४५ लाभार्थ्यांसाठी १०२ मेट्रिक टन तांदूळ व ७४ मेट्रिक टन गहू, देवरूखमधील ५५ हजार ७९६ लाभार्थ्यांसाठी १५०.५० मेट्रिक टन तांदूळ व १०० मेट्रिक टन गहू मंजूर झाला आहे.

जिल्हा मुख्यालयाच्या रत्नागिरी गोदामांतर्गत १ लाख ६१ हजार ७७० लाभार्थ्यांसाठी ४०७ मेट्रिक टन तांदूळ व २७६.५० मेट्रिक टन गहू, जयगडमधील ३१ हजार ३९४ लाभार्थ्यांसाठी ६८.५० मेट्रिक टन तांदूळ व ४६ मेट्रिक टन गहू, पालीमधील १५ हजार ८२५ लाभार्थ्यांसाठी ४७ मेट्रिक टन तांदूळ व ३१.५० मेट्रिक टन गहू पुरवला जाणार आहे. याव्यतिरिक्त लांजा गोदामांतर्गत ६५ हजार ७३० लाभार्थ्यांसाठी १८४ मेट्रिक टन तांदूळ व ११३ मेट्रिक टन गहू, राजापूरमधील ८४ हजार २३७ लाभार्थ्यांसाठी २१० मेट्रिक टन तांदूळ व १४० मेट्रिक टन गहू आणि पाचल गोदामांतर्गत २२ हजार ४७४ लाभार्थ्यांसाठी ५१ मेट्रिक टन तांदूळ व ३३ मेट्रिक टन गव्हाचा साठा वितरित करण्यात येणार आहे. रास्त भाव दुकानांना धान्य कोटा मंजूर करताना व त्याचे वितरण करताना १८ एप्रिल २०२२ च्या शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचे आणि वाटप प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याचे सक्त निर्देश जिल्हा पुरवठा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

Total Visitors :

5468443
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

डॉक्टर मारहाण प्रकरण; नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द, ३ दिवसांत शरण येण्याचे आदेश

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीतील बेपत्ता व्यापारी सज्जन ऊर्फ ‘पापा ओसवाल’ कोलकात्यात सुखरूप; एटीएम व्यवहारावरून ट्रेस झाले लोकेशन

Gramin Varta
1 Min Read

मुंबई-गोवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; महाडजवळ दीड कोटींची गोवा बनावटीची व्हिस्की जप्त, ट्रकसह चालकाला बेड्या

Gramin Varta
2 Min Read

मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाची उपसंचालक डॉ. दिलीप माने यांच्याकडून पाहणी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन २४ तास सज्ज; ‘सेवा संकल्प अभियाना’तून थेट जनतेपर्यंत शासकीय सेवा

3 Min Read
रत्नागिरी

Insights into Digital Transformation’s Impact on Application Writing

7 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत खडपेवठार येथील अंगणवाडीत बाल मेळावा उत्साहात संपन्न; चिमुकल्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीतील ‘माई ह्युंदाई’ शोरूममध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेने सज्ज नव्या ‘बेयॉन’ कारचे थाटात अनावरण; वाहनप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?