ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन २४ तास सज्ज; ‘सेवा संकल्प अभियाना’तून थेट जनतेपर्यंत शासकीय सेवा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन २४ तास सज्ज; ‘सेवा संकल्प अभियाना’तून थेट जनतेपर्यंत शासकीय सेवा
रत्नागिरी

नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन २४ तास सज्ज; ‘सेवा संकल्प अभियाना’तून थेट जनतेपर्यंत शासकीय सेवा

Gramin Varta
Last updated: September 17, 2026 2:32 pm
Gramin Varta
13 Views
Share

लोकसंवाद २०२६मध्ये जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची माहिती; प्रत्येक गावात एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

रत्नागिरी : स्वच्छता, आरोग्य, वृक्षारोपणासह विविध शासकीय सेवा आणि दाखले थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या अडचणी आणि प्रशासकीय प्रश्नांचे शक्य तितके जागेवरच निराकरण करण्यावर या अभियानाचा भर असून, नागरिकांच्या कोणत्याही अडचणी सोडविण्यासाठी संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने कुवारबाव उत्कर्ष नगर येथील वडार समाज सेवा गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी जिंदल यांनी ‘सेवा संकल्प अभियाना’ची सविस्तर माहिती दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे उपस्थित होत्या.

१७ ऑक्टोबरपर्यंत अभियान; विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील २५ वर्षांच्या लोकसेवेच्या निमित्ताने ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. १७ सप्टेंबरपासून १७ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानाच्या माध्यमातून विविध विभागांच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच त्यांच्या प्रशासकीय अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

नागरिकांना आवश्यक असलेले विविध शासकीय दाखले, कागदपत्रांशी संबंधित अडचणी तसेच विविध प्रशासकीय कामांचे निराकरण करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विविध सेवा आणि तक्रारींचे निवारण एकाच छताखाली करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रत्येक गावात एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

पर्यावरण संवर्धनालाही या अभियानात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील प्रत्येक गावात एक हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमात नागरिकांनीही सक्रिय सहभाग घेऊन पर्यावरण संवर्धनाच्या या मोहिमेला बळ द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जिंदल यांनी केले.

या अभियानात आरोग्य कर्मचारी, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी स्वतःहून पुढाकार घेत असल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. ‘सेवा संकल्प अभियान’ केवळ विविध उपक्रमांपुरते मर्यादित न राहता लोकांचे प्रत्यक्ष प्रश्न सोडविणारे अभियान ठरावे, यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कुवारबाव येथील वडार समाज सेवा गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवाला सामाजिक सेवेची जोड दिल्याबद्दल जिल्हाधिकारी जिंदल यांनी मंडळाचे विशेष कौतुक केले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, गटविकास अधिकारी उमेश गावधडकर, मंडळाचे अध्यक्ष सुनील वडार, उपाध्यक्ष विलास माने, खजिनदार सागर वाघ यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तातही चिपळूण पोलिसांची कर्तव्यतत्परता; रिक्षाचालकाचा हरवलेला मोबाईल शोधून केला सुपूर्द

Gramin Varta
2 Min Read

शाळेतून पत्नीला घेऊन परतताना काळाचा घाला;उभ्या पिकअपला दुचाकीची धडक, लेकीसह बापाचा अंत

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी : सैतवडे पेठ मोहल्ला येथे आईच्या आजारपणाच्या चिंतेत तरुणाने जीवन संपविले

Gramin Varta
2 Min Read

Bluetooth Technology Work in Tandem for Indoor Positioning System

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

‘देवाजीच्या दारी आज रंगला अभंग’; प्रादेशिक मनोरुग्णालयात भक्तीचा रंग

2 Min Read
रत्नागिरी

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात रत्नागिरीचे प्रथमेश गवाणकर उच्च न्यायालयात; कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल

1 Min Read
रत्नागिरी

Latest Trends and Insights in Shaping Industries for the Future

रत्नागिरी

शेतकरी मदत केंद्र सुरू करून दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने पाहणी करा; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांचे आवाहन

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?