ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमसाठी ‘चलो दिल्ली’; १ नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमसाठी ‘चलो दिल्ली’; १ नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलन
महाराष्ट्र

जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमसाठी ‘चलो दिल्ली’; १ नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलन

Gramin Varta
Last updated: September 21, 2026 9:10 am
Gramin Varta
27 Views
Share

२ ऑक्टोबरपासून सत्याग्रह, २५ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय मोर्चाचे आयोजन – विजय वडेट्टीवार

नागपूर: जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम असला पाहिजे, तसेच ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर १ नोव्हेंबर रोजी चलो दिल्लीचा नारा आज ओबीसी बैठकीत देण्यात आला.

यासाठी व्यापक आंदोलन उभारण्यासाठी नागपुरात विदर्भस्तरीय ओबीसी नेते पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

बैठकीनंतर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसींची स्वतंत्र कॉलमसह जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ही आमची स्पष्ट मागणी आहे. सरकारने जनगणनेच्या प्रक्रियेबाबत घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. ओबीसींची खरी लोकसंख्या समोर आली नाही, तर त्यांच्या प्रतिनिधित्वाचा आणि आरक्षणाचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो.

१३ सप्टेंबर रोजी दिल्लीत देशभरातील सुमारे ६५ ओबीसी संघटनांची बैठक झाली. या बैठकीतील निर्णयांच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी आंदोलनाची तयारीला सुरुवात झाली आहे. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त तालुका स्तरावर सत्याग्रह, २५ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय आंदोलन व मोर्चे आणि त्यानंतर १ नोव्हेंबर रोजी ‘चलो दिल्ली’चा नारा देत देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. दिल्लीतील आंदोलनाचे स्वरूप देशभरातील संघटनांच्या संयुक्त बैठकीत निश्चित करण्यात येईल, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली नाही तर भविष्यात आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्वतंत्र कॉलमसह जातनिहाय जनगणना होणे अत्यावश्यक आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरही त्यांनी सरकारला जाब विचारला. महाज्योती, बार्टी सारख्या संस्थांना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी, तसेच मॅट्रिकपूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती यांसारख्या विषयांवर सरकारकडून वेळकाढूपणा होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ओबीसी समाजाच्या हक्कांशी संबंधित प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने कोणत्याही समाजाच्या हक्कातील वाटा दुसऱ्या समाजाला देऊ नये. ज्यांना आरक्षण द्यायचे असेल ते स्वतंत्रपणे द्या, मात्र ओबीसींच्या वाट्याचे आरक्षण कुणालाही देऊ नका. आमच्या हक्कांवर गदा आली तर आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.

दिल्लीतील आंदोलनाची रुपरेषा ही दिल्लीत ठरवली जाईल. ओबीसींच्या ६० संघटना एकत्र येऊन यावर काम करत आहे.याबाबतची अधिकची माहिती ही दिल्लीत देण्यात येईल अस वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवरही विजय वडेट्टीवार यांनी सरकारला तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्राकडून मदतीची वाट पाहू नका. राज्याच्या तिजोरीतून तातडीने मदत करा. मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना ज्या मागण्या करत होते, त्याच मागण्या आता सत्तेत असताना पूर्ण कराव्यात, असे ते म्हणाले.

दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी जाणाऱ्या पालकमंत्र्यांना उद्देशून वडेट्टीवार म्हणाले की, शेतकऱ्यांची परिस्थिती केवळ पाहून न जाता ती संवेदनशीलतेने समजून घेणे आवश्यक आहे. कोरड्या नजरेने पाहू नका, शेतकऱ्यांची अवस्था पाहून तुमच्या डोळ्यात त्याचे भाव दिसले पाहिजेत. पाहणी केल्यानंतर ठोस निर्णय झाला नाही तर आम्ही सरकारला जाब विचारू, असा इशारा त्यांनी दिला.

नांदेड येथील बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांकडून काजू-बदाम दिल्याच्या चर्चेवर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले, काजू-बदाम खाल्ल्याने कोणाचे मन बदलत नाही. दुष्काळासारख्या संवेदनशील विषयावर ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मदत आणि उपाययोजना हव्यात.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने यापूर्वीच्या आंदोलनांमध्ये आश्वासने आणि कागदपत्रांच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. आता जरांगे पाटील यांनी मांडलेल्या मागण्यांवर सरकारने घेतलेल्या निर्णयांचा अभ्यास केला जाईल.

त्या मागण्यांमधून ओबीसींचे हक्क हिरावले जात असतील तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. आमच्या वाट्याचे कुणालाही देऊ नका. ज्यांना द्यायचे आहे ते स्वतंत्रपणे द्या. आता न्यायालयीन लढाईही सुरू झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

जरांगे समर्थकांकडून होणाऱ्या टीकेबाबतही त्यांनी संयमाची भूमिका घेतली. शिव्या आम्हालाही देता येतात,मात्र ती आमची संस्कृती आणि संस्कार नाहीत, असे वडेट्टीवार म्हणाले.

Total Visitors :

5469378
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

ढोंगी बाबाचा संतापजनक विकृत चेहरा उघड; पुण्यात सेवेच्या नावाखाली महिलेवर लैंगिक अत्याचार, संत इंद्रदेव महाराजाविरोधात गुन्हा दाखल

Gramin Varta
2 Min Read

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची देशभरात ‘महामोहीम’; संगमेश्वर तालुक्यातील बामणोली गावाची विशेष निवड

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी : शिळ येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; पावणेदोन लाखांचे रसायन व साहित्य जप्त, एकावर गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

काळबादेवी शाळेचे मुख्याध्यापक संतोष भुवड यांना शिवाजी विद्यापीठाची ‘पीएच.डी.’ पदवी प्रदान

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

शाळेतून पत्नीला घेऊन परतताना काळाचा घाला;उभ्या पिकअपला दुचाकीची धडक, लेकीसह बापाचा अंत

2 Min Read
महाराष्ट्र

विधानपरिषद निकालानंतर महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर; भाजप आणि शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक फैरी

2 Min Read
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नाही – सुनील तटकरे

2 Min Read
महाराष्ट्र

नटसम्राट अनंतात विलीन ; शासकीय इतमामात अखेरचा निरोप

4 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?