ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: काळबादेवी शाळेचे मुख्याध्यापक संतोष भुवड यांना शिवाजी विद्यापीठाची ‘पीएच.डी.’ पदवी प्रदान
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » काळबादेवी शाळेचे मुख्याध्यापक संतोष भुवड यांना शिवाजी विद्यापीठाची ‘पीएच.डी.’ पदवी प्रदान
रत्नागिरी

काळबादेवी शाळेचे मुख्याध्यापक संतोष भुवड यांना शिवाजी विद्यापीठाची ‘पीएच.डी.’ पदवी प्रदान

Gramin Varta
Last updated: November 4, 2026 4:08 pm
Gramin Varta
183 Views
Share

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा काळबादेवीचे मुख्याध्यापक संतोष सुदाम भुवड यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून शिक्षणशास्त्र विषयात नुकतीच विद्यावाचस्पती अर्थात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषा कौशल्यांच्या विकासासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या विषयावर त्यांनी सखोल संशोधन केले असून, त्यांच्या या उत्तुंग शैक्षणिक यशामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात मोठे कौतुक होत आहे.

त्यांच्या संशोधनाचा मूळ विषय “Development of Digital Learning Strategies for Enhancing English Language Skills at Primary Education Level” हा होता. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये श्रवण, संभाषण, वाचन आणि लेखन ही चारही मूलभूत भाषा कौशल्ये विकसित करण्यासाठी डिजिटल शिक्षण रणनीती कशा प्रकारे परिणामकारक ठरतात, याचा तुलनात्मक व अभ्यासपूर्ण वेध त्यांनी आपल्या प्रबंधात घेतला आहे. पारंपरिक अध्यापन पद्धतींपेक्षा आधुनिक डिजिटल साधने विद्यार्थ्यांच्या भाषा विकासात अधिक गती आणू शकतात, हे त्यांनी आपल्या संशोधनातून सिद्ध केले. या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना मौनी विद्यापीठ गारगोटी येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. पी. बी. दराडे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

गेल्या २९ वर्षांपासून प्राथमिक शिक्षण क्षेत्रात अविरत कार्यरत असणाऱ्या संतोष भुवड यांनी यापूर्वीही शालेय पोषण आहार योजना तसेच व्यावसायिक मार्गदर्शनाचा परिणाम या विषयांवर संशोधन करून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) पुणे येथे प्रबंध सादर केले आहेत. डी.एड., बी.ए., बी.एड., एम.ए., एम.एड. अशा उच्च शैक्षणिक पदव्यांसह त्यांनी SET, TET (पेपर १ व २) आणि केंद्रीय CTET (पेपर १ व २) या सर्व कठीण पात्रता परीक्षाही यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्या आहेत. शाळेत डिजिटल तंत्रज्ञानाचा विस्तार, गणितीय व भाषा कौशल्यांचा विकास आणि नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी ते सातत्याने कार्यरत असतात.

नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा समतोल सांभाळत त्यांनी पूर्ण केलेल्या या संशोधन प्रवासात पत्नी साक्षी, आई-वडील तसेच बंधू विनायक व संदीप यांचे मोलाचे पाठबळ लाभल्याचे त्यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले. शिक्षणशास्त्र विषयात पीएच.डी. संपादन करून डॉ. संतोष भुवड यांनी मिळवलेल्या या बहुमानाबद्दल शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर, शिक्षकवृंद, शिक्षण विभाग आणि काळबादेवी ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Total Visitors :

5469378
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

Profiling the Visionaries Behind Cutting-Edge Startup Ventures

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत व सरसकट कर्जमाफी द्यावी : हर्षवर्धन सकपाळ

Gramin Varta
3 Min Read

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा उत्तर प्रदेशाला सर्वाधिक फटका; पाच राज्यांत तब्बल सव्वादोन कोटींची घट

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी : चाफेरी बौद्धवाडीतून वृद्ध बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

कोकण रेल्वे मार्गाचे येत्या ५ वर्षांत दुपदरीकरण पूर्ण करणार; दररोज धावणार १०० हून अधिक गाड्या

2 Min Read
रत्नागिरी

संकटग्रस्तांच्या मदतीसाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा संवेदनशील पुढाकार; मुख्यमंत्री सहायता निधीला ११ लाख रुपयांचे मोलाचे योगदान

1 Min Read
रत्नागिरी

खेडशी परिसरात ट्रॅव्हल्सची मोकाट वासराला धडक; नागरिक, पोलिस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेने मुक्या जीवाला जीवदान

2 Min Read
रत्नागिरी

रत्‍नागिरीतील तरुणाचा ओमानमध्ये विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?