ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: खेडशी परिसरात ट्रॅव्हल्सची मोकाट वासराला धडक; नागरिक, पोलिस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेने मुक्या जीवाला जीवदान
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » खेडशी परिसरात ट्रॅव्हल्सची मोकाट वासराला धडक; नागरिक, पोलिस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेने मुक्या जीवाला जीवदान
रत्नागिरी

खेडशी परिसरात ट्रॅव्हल्सची मोकाट वासराला धडक; नागरिक, पोलिस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेने मुक्या जीवाला जीवदान

Gramin Varta
Last updated: September 23, 2026 1:32 pm
Gramin Varta
116 Views
Share

रत्नागिरी /प्रतिनिधी : मिऱ्या–नागपूर महामार्गावर मंगळवारी (२२ सप्टेंबर) रात्री पावणे नऊच्या सुमारास खेडशी येथील आकाशवाणी केंद्राच्या समोर एका ट्रॅव्हल्सची मोकाट वासराला जोरदार धडक बसली. धडकेनंतर वासरू रस्त्यावरच कोसळल्याने काही काळ घटनास्थळी चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, अपघातानंतर स्थानिक नागरिक, पोलिस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे जखमी मुक्या जीवाला वेळीच उपचार मिळाले.

ट्रॅव्हल्सची धडक बसताच वासरू रस्त्यावर पडले. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, ठेकेदार रवी इन्फ्रा बिल्ड कंपनीचे कर्मचारीही तेथे दाखल झाले. जखमी वासराची अवस्था पाहता त्याच्यावर उपचार कोण करणार, हा प्रश्न उपस्थित झाला. नागरिकांनी तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलावले. दरम्यान, या अपघाताची माहिती ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पालवे यांना मिळताच त्यांनी तत्काळ दखल घेऊन हातखंबा बीट अंमलदार भिसे आणि खेडशी बीट अंमलदार कदम यांना घटनास्थळी दाखल होण्यास सांगितले.

विशेष म्हणजे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शंतनु घोगरे यांना माहिती मिळताच त्यांनीही क्षणाचाही विलंब न करता घरातून थेट घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच ते घटनास्थळी पोहोचले आणि जखमी बैलाची तपासणी करून आवश्यक इंजेक्शन व उपचार केले. त्यामुळे मुक्या जीवाला तातडीची वैद्यकीय मदत मिळाली. अपघात, वाहतूक आणि मानवी धावपळीच्या वातावरणात अनेकदा मुक्या जीवांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. मात्र, या घटनेत स्थानिक नागरिकांनी दाखविलेली संवेदनशीलता, पोलिसांनी घेतलेली तातडीची दखल आणि डॉ. घोगरे यांनी वेळ न दवडता घटनास्थळी पोहोचून केलेले उपचार, यामुळे माणुसकीचा वेगळाच प्रत्यय आला आहे.

मुक्या जीवाला शब्दांत वेदना व्यक्त करता येत नाहीत; मात्र त्याच्या वेदना ओळखून मदतीला धावून जाणे, हीच खरी माणुसकी. अपघातानंतर उपस्थित नागरिक, पोलिस कर्मचारी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे जखमी बैलाला उपचार मिळाले. त्याचा जीव वाचविण्यासाठी झालेल्या या सामूहिक प्रयत्नाचे कौतुक होत आहे. ‘गरजेच्या क्षणी मदतीला धावून येणे’ या साध्या कृतीतूनच माणुसकीचे मोठेपण अधोरेखित होते. या घटनेतही तेच दिसून आले. मुक्या जीवाला वेळीच उपचार मिळाले, यातच उपस्थित सर्वांनीच समाधान मानले.

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूणात संशयास्पदरीत्या मोटारसायकल चालविणारा तरुण ताब्यात; ५० हजारांची दुचाकी जप्त

Gramin Varta
1 Min Read

रोजगार महाकुंभ महाराष्ट्रला नवी बळकटी; राज्य कौशल्य विकास सोसायटी-सृजन ट्रस्टमध्ये सामंजस्य करार

Gramin Varta
3 Min Read

Insights into Digital Transformation’s Impact on Application Writing

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

आकाशाला गवसणी घालणारे अतुलनीय शौर्य; भारतीय लष्कराच्या जांबाज श्वानाची पॅराशूटसह ऐतिहासिक झेप

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी: लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या संशयिताला ३ दिवसांची पोलीस कोठडी

1 Min Read
रत्नागिरी

‘सेवा संकल्प अभियाना’ने तीन वर्षांच्या चिमुरडीला दिले नवे आयुष्य; दुभंगलेले ओठ आणि टाळूवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

2 Min Read
रत्नागिरी

शेतकरी मदत केंद्र सुरू करून दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने पाहणी करा; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांचे आवाहन

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?