चिपळूण : देसाई बाजार-पाग नाका परिसरात संशयास्पदरीत्या मोटारसायकल चालविताना आढळून आलेल्या १८ वर्षीय तरुणाला चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवार, १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२.२० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरमान बशीर अहमद शेख (वय १८, रा. दिहवा सोनी, गोंडा, उत्तर प्रदेश) हा एमएच १४ एए २१३१ क्रमांकाची मोटारसायकल संशयास्पदरीत्या चालवत असताना आढळून आला. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडे मोटारसायकलच्या मालकी हक्काबाबत तसेच आवश्यक कागदपत्रांबाबत चौकशी केली. मात्र, त्याला सदर मोटारसायकलच्या मालकीबाबत समाधानकारक स्पष्टीकरण देता आले नाही.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८०/२०२६ अन्वये महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम १२४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी सुमारे ५० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल जप्त केली आहे. सदर वाहनाचा चेसीस क्रमांक व इंजिन क्रमांक दिसून येत नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.
चिपळूणात संशयास्पदरीत्या मोटारसायकल चालविणारा तरुण ताब्यात; ५० हजारांची दुचाकी जप्त
Leave a Comment





