गोवळकोटमध्ये शेतकरी बांधवांसोबत फराळाचा आनंद; विरोधकांच्या टीकेला दिले प्रत्युत्तर
चिपळूण : दिवाळीच्या सणानिमित्त चिपळूणचे शिंदे शिवसेनेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी गोवळकोट येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. यावेळी शेतकरी बांधवांसोबत फराळाचा आनंद घेत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास दिला.
आमदार भास्कर जाधव हे विरोधी पक्षात असल्याने ते टीका करणारच; मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ठाम भूमिका उमेश सकपाळ यांनी मांडली. शेतकऱ्यांसोबत साजरी केलेली दिवाळी हा केवळ नाटक किंवा देखावा नसून, आपण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बांधकाम समिती सभापती कपिल शिर्के, पाणीपुरवठा समिती सभापती निहार कोवळे, गटनेते अंकुश आवले, नगरसेवक उदय जुवळे, शिवसेना उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण आणि दयानंद जुवळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.





