ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: तोंडली-मोडीतर-शिवणे पुलाच्या उभारणीसाठी जिल्हा परिषदेचा हिरवा कंदील; दोन्ही सभागृहांत ठराव मंजूर
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » तोंडली-मोडीतर-शिवणे पुलाच्या उभारणीसाठी जिल्हा परिषदेचा हिरवा कंदील; दोन्ही सभागृहांत ठराव मंजूर
चिपळूण

तोंडली-मोडीतर-शिवणे पुलाच्या उभारणीसाठी जिल्हा परिषदेचा हिरवा कंदील; दोन्ही सभागृहांत ठराव मंजूर

Gramin Varta
Last updated: October 17, 2026 4:28 pm
Gramin Varta
57 Views
Share

जि.प. सदस्या शिवानी सावंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; चार तालुक्यांसह ४५ गावांच्या दळणवळणाला मिळणार चालना

चिपळूण:- अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या तोंडली-मोडीतर-शिवणे येथील कापशी नदीवरील पुलाच्या उभारणीच्या दिशेने रत्नागिरी जिल्हा परिषदेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीपाठोपाठ सर्वसाधारण सभेतही या पुलाच्या उभारणीसाठी शासनाकडे शिफारस करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे बहुप्रतीक्षित पुलाच्या उभारणीला महत्त्वपूर्ण बळ मिळाले असून, पुढील कार्यवाहीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

जिल्हा परिषद सदस्या तथा स्थायी समिती सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत यांनी या पुलाची गरज लक्षात घेऊन उभारणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. या अनुषंगाने संबंधित ठिकाणाची पाहणी व सर्वेक्षण करून पुलाची उपयुक्तता तपासण्यात आली. त्यानंतर स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभा या दोन्ही सभागृहांत शासनाकडे शिफारस करण्याचा ठराव बहुमताने मंजूर झाला. पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून शासनस्तरावर मंजुरी आणि आवश्यक निधीसाठी पाठपुरावा होत असून, त्यांच्या पुढाकारामुळे या बहुप्रतीक्षित पुलाच्या उभारणीला गती मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.

चिपळूण तालुक्यातील तोंडली-मोडीतर आणि गुहागर तालुक्यातील शिवणे या गावांदरम्यान कापशी नदीवर पूल उभारल्यास परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. या पुलामुळे गुहागर, संगमेश्वर आणि रत्नागिरी या भागांचा चिपळूणशी संपर्क अधिक सोयीचा होऊन चार तालुक्यांसह ४५ गावांच्या दळणवळणाला चालना मिळणार आहे. विद्यार्थ्यांचा प्रवास, रुग्णांची ये-जा आणि शेतमालाची वाहतूक अधिक सुलभ होण्याबरोबरच नागरिकांच्या वेळेची व श्रमांची बचत होणार आहे.

तसेच या पुलामुळे परिसरातील निसर्गरम्य पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे सोयीचे होऊन पर्यटनविकासालाही नवी संधी मिळेल. पर्यटकांची वर्दळ वाढल्यास स्थानिक हॉटेल व्यवसाय, खाद्यपदार्थ विक्री, वाहतूक आणि अन्य पूरक व्यवसायांना चालना मिळून रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यामुळे हा पूल केवळ दोन भागांना जोडणारा दुवा न ठरता ग्रामीण विकास आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देणारा महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरेल. जिल्हा परिषदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर झालेल्या ठरावामुळे पुलाच्या उभारणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.

Total Visitors :

5469270
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राजापूर ग्रामीण रुग्णालयात जनरल शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी; महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता दरमहा होणार मोफत शस्त्रक्रिया

Gramin Varta
1 Min Read

११,५०० फुटांवर रत्नागिरीचा झेंडा; अभिजित पड्याळ यांची लडाख मॅरेथॉन ५ तास २२ मिनिटांत पूर्ण

Gramin Varta
2 Min Read

चिपळूणमध्ये वालोपे येथील नदीकिनारी अवैध हातभट्टीवर पोलिसांचा छापा; दीड लाखांचे दारू व रसायन जागेवरच केले नष्ट

Gramin Varta
1 Min Read

तोतया पोलीस कमिशनरकडून देवरूखच्या एलआयसी एजंटची ९४ हजारांची फसवणूक

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

चिपळूण

शारदोत्सवात तुरंबव मार्गावर सावर्डे पोलिसांचे वाहतूक कोंडीवर प्रभावी नियंत्रण; सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या नियोजनाचे भाविकांकडून कौतुक

2 Min Read
चिपळूण

गोवळकोट व पेठमापमधील मचूळ पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्ष उमेश सकपाळ मैदानात

2 Min Read
चिपळूण

सावर्डे विद्यालयात गणित पाढे पाठांतर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४०० विद्यार्थ्यांचा सहभाग

3 Min Read
चिपळूण

घरडा केमिकल्स लिमिटेडला FICCI चे राष्ट्रीय स्तरावरील दोन प्रतिष्ठित पुरस्कार

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?