ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ११,५०० फुटांवर रत्नागिरीचा झेंडा; अभिजित पड्याळ यांची लडाख मॅरेथॉन ५ तास २२ मिनिटांत पूर्ण
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ११,५०० फुटांवर रत्नागिरीचा झेंडा; अभिजित पड्याळ यांची लडाख मॅरेथॉन ५ तास २२ मिनिटांत पूर्ण
रत्नागिरी

११,५०० फुटांवर रत्नागिरीचा झेंडा; अभिजित पड्याळ यांची लडाख मॅरेथॉन ५ तास २२ मिनिटांत पूर्ण

Gramin Varta
Last updated: September 16, 2026 4:52 pm
Gramin Varta
6 Views
Share

विरळ ऑक्सिजन, चढ-उतार आणि श्वसनाच्या अडचणींवर मात; कॉम्रेड्सनंतर लडाखमध्येही दमदार कामगिरी

रत्नागिरी : समुद्रसपाटीपासून सुमारे ११,५०० फूट उंचीवर, विरळ ऑक्सिजनच्या वातावरणात आणि आव्हानात्मक चढ-उतारांच्या मार्गावर ४२.१९५ किमीची लडाख मॅरेथॉन ५ तास २२ मिनिटांत पूर्ण करत रत्नागिरीचे अल्ट्रा रनर अभिजित अशोक पड्याळ यांनी दमदार कामगिरी केली.

लडाख मॅरेथॉनचा मार्ग चोगलमसर, चुचोट आणि स्टकना या परिसरातून जातो. उंची, चढ-उतार आणि कमी ऑक्सिजन उपलब्धतेमुळे ही स्पर्धा धावपटूंसाठी मोठे आव्हान मानली जाते. अभिजित यांनी सुरुवातीचे २१ किमी वेगाने पूर्ण केले. मात्र पुढे उंची वाढत गेल्याने श्वसनाचा त्रास जाणवू लागला. प्रतिकूल परिस्थितीतही वेग आणि मानसिक ताकद कायम ठेवत त्यांनी अखेर ५ तास २२ मिनिटांत मॅरेथॉन पूर्ण केली.

अभिजित यांचा सुरुवातीला खारदुंग ला चॅलेंज ७२ किमी या स्पर्धेत सहभागी होण्याचा मानस होता. मात्र नोंदणी पूर्ण झाल्याने त्यांनी फुल मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. लडाखच्या उंचीशी शरीर जुळवून घेण्यासाठी त्यांनी स्पर्धेच्या आठ दिवस आधी लडाख गाठले.

“लडाख मॅरेथॉन ही फक्त धावण्याची स्पर्धा नाही; ती कठीण परिस्थितीशी जुळवून घेण्याची आणि त्यावर मात करण्याची परीक्षा आहे. प्रशिक्षणासोबत मानसिक ताकद आणि सातत्य खूप महत्त्वाचे आहे. कोणत्याही क्षेत्रात सातत्य ठेवले, तर यश नक्की मिळते,” असे अभिजित यांनी सांगितले.

अभिजित यांच्या धावण्याच्या कारकिर्दीत यापूर्वीही अनेक उल्लेखनीय कामगिरीची नोंद आहे. टाटा मुंबई मॅरेथॉन ४२ किमी ३ तास ५८ मिनिटांत पूर्ण करून सब-४, मानाच्या लोहापुरुष स्पर्धेत द्वितीय क्रमांक, सावंतवाडी ६ तास रनमध्ये द्वितीय क्रमांक, तसेच दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉनच्या अपहिल स्पर्धेत ८६ किमी अंतर ९ तास ५१ मिनिटे १२ सेकंदांत पूर्ण करून रॉबर्ट मत्शाली मेडल त्यांनी मिळवले आहे.

या प्रवासात प्रशिक्षक दादासो सत्रे यांचे मार्गदर्शन लाभले. लडाख मॅरेथॉनच्या उत्कृष्ट आयोजनाचे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वातावरणाचे अभिजित यांनी कौतुक केले. या यशासाठी केसीएम, आरसीसी मित्रपरिवार, कुटुंबीय आणि सर्व समर्थकांचे त्यांनी आभार मानले.

लडाखला रवाना होण्यापूर्वी घेतलेले श्री देव भैरी आणि सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू यांचे आशीर्वाद या प्रवासात प्रेरणादायी ठरल्याचे अभिजित यांनी नमूद केले.

कॉम्रेड्स मॅरेथॉनपासून लडाखच्या उंच पर्वतरांगांपर्यंतचा हा प्रवास रत्नागिरीच्या धावपटूच्या जिद्द, मेहनत आणि सातत्याची नवी ओळख ठरला आहे. अभिजित यांच्या या कामगिरीमुळे कोकणातील तरुणांना रनिंग, फिटनेस आणि सातत्याची प्रेरणा मिळणार आहे.

Total Visitors :

5427562
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी 6 वर्षांनी गुन्हा दाखल; सामूहिक अत्याचार, हत्येसह कटाचे कलम

Gramin Varta
3 Min Read

मंडणगड: हातात चाकू घेऊन गावात दहशत निर्माण करणाऱ्यावर गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

दापोलीत काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात संपन्न

Gramin Varta
2 Min Read

Exploring Technological Trends in Optometry and Vision Care

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

पोलिओने पाऊल थांबवले, जिद्दीने आयुष्याची वाटचाल सुरू ठेवली; शाकीरा कुरेशींच्या जीवनात विवाहाने उमलली नव्या पर्वाची पहाट

4 Min Read
रत्नागिरी

खेडशी परिसरात ट्रॅव्हल्सची मोकाट वासराला धडक; नागरिक, पोलिस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेने मुक्या जीवाला जीवदान

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी: मुरुगवाड्यात विक्रीच्या उद्देशाने हेरॉईन बाळगणारा २२ वर्षीय तरुण ताब्यात

1 Min Read
रत्नागिरी

मिरकरवाडा बंदरातील मोडकळीस आलेल्या विनावापर नौका हटवण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदत

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?