ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ब्रेकिंग : रत्नागिरीपाठोपाठ राजापूर न्यायालयालाही बॉम्बची धमकी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ब्रेकिंग : रत्नागिरीपाठोपाठ राजापूर न्यायालयालाही बॉम्बची धमकी
राजापूर

ब्रेकिंग : रत्नागिरीपाठोपाठ राजापूर न्यायालयालाही बॉम्बची धमकी

Gramin Varta
Last updated: November 2, 2026 3:48 pm
Gramin Varta
779 Views
Share

न्यायालयाची इमारत पोलिसांकडून रिकामी; बॉम्बशोधक पथकाकडून कसून तपासणी

राजापूर/ तुषार पाचलकर: रत्नागिरी जिल्हा न्यायालयापाठोपाठ आता राजापूर येथील दिवाणी व कनिष्ठ स्तर न्यायालयालाही ई-मेलद्वारे बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने राजापूरच्या प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत न्यायालयाची संपूर्ण इमारत रिकामी केली. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच विविध कामांसाठी आलेल्या पक्षकारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

रत्नागिरी जिल्हा न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्यानंतर राजापूर न्यायालयालाही अशाच प्रकारचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती समोर आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांनी तातडीने न्यायालय परिसरात धाव घेत सुरक्षा व्यवस्था ताब्यात घेतली.

सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालयातील सर्वांना बाहेर काढल्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाकडून न्यायालयाच्या इमारतीतील प्रत्येक खोली, कोपरा आणि परिसराची कसून तपासणी सुरू करण्यात आली. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

या अचानक घडलेल्या प्रकारामुळे राजापूर न्यायालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. न्यायालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांचीही मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

प्राथमिक माहितीनुसार, अशाच प्रकारचे धमकीचे ई-मेल राज्यातील इतरही काही न्यायालयांना प्राप्त झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या प्रकाराकडे गांभीर्याने पाहिले जात असून पोलीस व प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

दरम्यान, धमकीच्या ई-मेलमागील नेमके कारण काय, हा संदेश कोठून पाठविण्यात आला आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास सुरू आहे. न्यायालयाच्या इमारतीत प्रत्यक्षात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली आहे का, याबाबत अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे.

Total Visitors :

5469327
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

करबुडे येथील २७ वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा संशय, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

‘ग्रामीण वार्ता’च्या बातमीची प्रशासनाकडून दखल; पालशेत-जोईलवाडीत अखेर पाणीपुरवठा पूर्ववत

Gramin Varta
1 Min Read

प्रभासच्या ‘फौजी’चा टीझर प्रदर्शित; ब्रिटिशांविरुद्ध लढणाऱ्या योद्ध्याच्या भूमिकेत दिसणार अभिनेता

Gramin Varta
2 Min Read

राजापुरात अल्पवयीन युवतीवरील अत्याचार प्रकरणी लॉज मालकासह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या चौघांवर गुन्हे दाखल

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

राजापूर

राजापुरात बंद खोलीत सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा

2 Min Read
राजापूर

आशिया रोबोटिक्स स्पर्धेत वडदहसोळच्या अफ्फान मुकादमची सुवर्ण कामगिरी; राजापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

2 Min Read
राजापूर

कारवली गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी माजी सरपंच गणेश वरेकर यांची बिनविरोध निवड

1 Min Read
राजापूर

राजापूर: प्रा. मंजुषा सूर्यवंशी यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची इंग्रजी विषयात डॉक्टरेट

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?