ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: करबुडे येथील २७ वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा संशय, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » करबुडे येथील २७ वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा संशय, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी

करबुडे येथील २७ वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा संशय, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Gramin Varta
Last updated: September 17, 2026 3:48 pm
Gramin Varta
34 Views
Share

रत्नागिरी : तालुक्यातील करबुडे येथून २७ वर्षीय तरुण अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, त्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रफुल्ल प्रकाश तांबे (वय २७, रा. घर क्र. १०८८, करबुडे, मळगाव, ता. जि. रत्नागिरी) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील प्रकाश गोपाळ तांबे (वय ६०) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रफुल्ल याने गणपतीची पूजा केली. त्यानंतर सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास ‘मी निवळी येथे जाऊन येतो,’ असे वडिलांना सांगून तो घरातून बाहेर पडला. मात्र, त्यानंतर तो पुन्हा घरी परतलाच नाही.

प्रफुल्ल घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा आजूबाजूचा परिसर, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी तसेच सासरवाडी येथे शोध घेतला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण करून नेले असावे, असा संशय व्यक्त करत पोलिसांत धाव घेतली.

या घटनेची नोंद १६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.०१ वाजता रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२२/२०२६ अन्वये करण्यात आली आहे. बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitors :

5427500
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणात ७० वर्षीय नराधमाला फाशीची शिक्षा

Gramin Varta
2 Min Read

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची देशभरात ‘महामोहीम’; संगमेश्वर तालुक्यातील बामणोली गावाची विशेष निवड

Gramin Varta
2 Min Read

एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार १२ हजार रुपये

Gramin Varta
2 Min Read

हप्ता थकला तरी बळजबरीने वाहन जप्ती करता येणार नाही; फायनान्स कंपनीला १० लाखांच्या दंडासह वसुली नियमांवर कडक ताशेरे

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

अवैध मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर कारवाईचा बडगा; रत्नागिरीत मत्स्य विभागाची धडक कारवाई

1 Min Read
रत्नागिरी

कळझोंडी उपकेंद्रात सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ६२ ग्रामस्थांनी घेतला लाभ

2 Min Read
रत्नागिरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २३ वे देहदान; ‘सेवा संकल्प अभियाना’तील पहिलेच दान

2 Min Read
रत्नागिरी

आरोग्य शिबिरांसह वृक्षारोपणाने उद्यापासून रत्नागिरीत ‘सेवा संकल्प अभियाना’ला सुरुवात

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?