ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: कुत्र्याला वाचवताना रिक्षा उलटून देवधेचे उपसरपंच संजय मणचेकर यांचा दुर्दैवी अंत
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » कुत्र्याला वाचवताना रिक्षा उलटून देवधेचे उपसरपंच संजय मणचेकर यांचा दुर्दैवी अंत
लांजा

कुत्र्याला वाचवताना रिक्षा उलटून देवधेचे उपसरपंच संजय मणचेकर यांचा दुर्दैवी अंत

Gramin Varta
Last updated: October 21, 2026 7:33 pm
Gramin Varta
2.5k Views
Share

लांजा: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांजा नजीक धनावडे फार्मजवळ आज दुपारी घडलेल्या एका भीषण अपघातात देवधे गावचे विद्यमान उपसरपंच संजय नारायण मणचेकर (वय ४२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रस्त्यावर अचानक आडव्या आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटी झाल्याने हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय मणचेकर हे व्यवसायाने रिक्षाचालक असून ते लांजा शहरातून आपल्या घरी देवधे येथे दुपारच्या जेवणासाठी रिक्षा घेऊन निघाले होते. त्यांची रिक्षा महामार्गावरील धनावडे शेती फार्म परिसरात आली असता, अचानक एक भटकते कुत्रे वाहनासमोर आले. कुत्र्याला वाचवण्यासाठी त्यांनी चालकाचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला असता रिक्षा अनियंत्रित होऊन रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात मणचेकर यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच त्यांचे चुलतभाऊ प्रकाश जानू मणचेकर यांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने लांजा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना तत्काळ लांजा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

संजय मणचेकर हे देवधे गावच्या विकासात नेहमी अग्रेसर असणारे एक कार्यक्षम आणि मनमिळाऊ लोकप्रतिनिधी म्हणून सुपरिचित होते. त्यांच्या अशा अकाली आणि दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण देवधे गावावर तसेच लांजा परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Total Visitors :

5468436
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूण: पोफळीतील बंद घराचा कडी-कोयंडा तोडून पावणेतीन लाखांचे दागिने लंपास

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी जिल्ह्यातील ९ हजार बागायतदारांच्या खात्यात ३० कोटींचा पीकविमा जमा; हवामान बदलाच्या फटक्यानंतर शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी शहरात १२ ऑक्टोबरपासून पाणी कपात; दर सोमवारी पुरवठा बंद, वेळेतही १५ मिनिटांची घट

Gramin Varta
1 Min Read

पाचल मंडळात संभाव्य पाणीटंचाईचा प्रशासनाकडून संयुक्त आढावा; विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींची उपस्थिती

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

लांजा

लांजा: वेरवलीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर २०२२ मधील चोरीच्या तपासाची मागणी

2 Min Read
लांजा

प्राथमिक शिक्षक संघाची शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

2 Min Read
लांजा

लांजा : अपंगत्वाला कंटाळून गवाणे येथील प्रौढाने स्वतःला घेतले पेटवून,प्रकृती चिंताजनक

2 Min Read
लांजा

लांजा: वेरळच्या शाळेत मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा; शिक्षकाला मारहाण करणारा संशयित अटकेत

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?