ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी शहरात १२ ऑक्टोबरपासून पाणी कपात; दर सोमवारी पुरवठा बंद, वेळेतही १५ मिनिटांची घट
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी शहरात १२ ऑक्टोबरपासून पाणी कपात; दर सोमवारी पुरवठा बंद, वेळेतही १५ मिनिटांची घट
रत्नागिरी

रत्नागिरी शहरात १२ ऑक्टोबरपासून पाणी कपात; दर सोमवारी पुरवठा बंद, वेळेतही १५ मिनिटांची घट

Gramin Varta
Last updated: October 10, 2026 8:27 am
Gramin Varta
46 Views
Share

रत्नागिरी  : अल-निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगर परिषदेने शहरात १२ ऑक्टोबरपासून पाणी कपात लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन नियोजनानुसार दर सोमवारी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून, इतर दिवशीच्या नियमित पाणीवाटपाच्या वेळेत १५ मिनिटांची कपात केली जाणार असल्याची माहिती पाणी सभापती निमेश नायर यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहराची तहान भागवणाऱ्या शीळ धरणात सध्या अवघा ३.३२७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक असून बाष्पीभवनामुळे तो वेगाने खालावत आहे; परिणामी आगामी उन्हाळ्यात एप्रिल-मे महिन्यापर्यंत पाणी पुरवून वापरता यावे यासाठी प्रशासनाला तातडीने हा कठोर निर्णय घ्यावा लागल्याचे नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी स्पष्ट केले.

शहरातील टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी नगरपरिषदेने पर्यायी जलस्रोतांचा शोध सुरू केला असून नाचणे येथील तलाव आणि निवखोल परिसरातील विहिरी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याशिवाय शीळ येथील जुन्या जॅकवेल नजीक असलेल्या विहिरीतूनही पाणी उपसा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी पाण्याचा अपव्यय करणाऱ्या घटकांवर अंकुश ठेवण्यात येत असून व्यावसायिक वाहने धुण्याचे रॅम्प तसेच जलतरण तलावांना अधिकृत नोटिसा बजावण्यात येत आहेत; तसेच पालिकेकडून होणारा त्यांचा पाणीपुरवठा बंद करून कडक कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे नायर यांनी नमूद केले.

Total Visitors :

5469270
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या तिन्ही आरोपींना राजस्थानमधून अटक

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरीत रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी महिलेला भरधाव दुचाकीची धडक; दुचाकीस्वारावर गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

दाभोळ प्रकल्पातील वापरात नसलेली २०० हेक्टर जमीन मूळ शेतकऱ्यांना परत करा

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी बैठकीत संघटन बांधणीचा निर्धार; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

विभागीय सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेत वाटद खंडाळा विद्यालयाच्या मुलींचे घवघवीत यश; पटकावले उपविजेतेपद

2 Min Read
रत्नागिरी

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रत्नागिरी सज्ज : आपत्कालीन बचावासाठी ५ हायटेक ‘रोबोटिक वॉटर क्राफ्ट’ पोलीस दलात दाखल

2 Min Read
रत्नागिरी

फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० वर संपर्क साधण्याचे सायबर पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांचे आवाहन

3 Min Read
रत्नागिरी

भोके ते जयगड नवीन रेल्वे मार्ग होणार; जयगड-सातारा जोडणीचाही विचार

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?