ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ‘देवरूखचे मिनी नायगारा’ ओझर धबधब्याचा होणार कायापालट; ग्लास स्कायवॉक आणि पर्यटन विकासासाठी ७ कोटी ८० लाखांचा प्रस्ताव सादर
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ‘देवरूखचे मिनी नायगारा’ ओझर धबधब्याचा होणार कायापालट; ग्लास स्कायवॉक आणि पर्यटन विकासासाठी ७ कोटी ८० लाखांचा प्रस्ताव सादर
संगमेश्वर

‘देवरूखचे मिनी नायगारा’ ओझर धबधब्याचा होणार कायापालट; ग्लास स्कायवॉक आणि पर्यटन विकासासाठी ७ कोटी ८० लाखांचा प्रस्ताव सादर

Gramin Varta
Last updated: October 17, 2026 9:03 am
Gramin Varta
93 Views
Share

देवरूख : सह्याद्रीच्या कुशीतील निसर्गसंपन्न संगमेश्वर तालुक्यातील पूर गावच्या हद्दीत फेसाळणाऱ्या ओझर धबधब्याला महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी क्रांती व्यापारी संघटना देवरूखने ठोस पाऊल उचलले आहे. ‘देवनगरी देवरूख पर्यटन प्रकल्पा’अंतर्गत ओझर धबधबा आणि सप्तलिंगी नदी परिसराचा सर्वांगीण कायापालट करण्यासाठी तब्बल ७ कोटी ८० लाख रुपयांचा सर्वसमावेशक प्राथमिक विकास आराखडा तयार करून तो स्थानिक आमदार शेखर निकम यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. आमदार शेखर निकम यांनी पूर्वी या परिसराला भेट दिली असता निसर्गाची मुक्त उधळण पाहून या धबधब्याचा ‘देवरूखचे मिनी नायगारा’ असा गौरवपूर्ण उल्लेख केला होता, तसेच येथे ग्लास ब्रिज उभारण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर सिंधुरत्न समृद्धी योजना २.० अंतर्गत आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन या संपूर्ण प्रकल्पाला गती देण्याची मागणी व्यापारी संघटनेने लावून धरली आहे.

प्रस्तावित पर्यटन आराखड्यातील सर्वात मुख्य आकर्षण म्हणजे सप्तलिंगी नदी आणि ओझर धबधब्याचे विहंगम दर्शन घडवणारा आधुनिक ‘सिग्नेचर ग्लास स्कायवॉक’ ठरणार आहे. पारंपरिक पुलाऐवजी उंचावरून सुरक्षितपणे निसर्ग अनुभवता यावा म्हणून कँटिलिव्हर अथवा यू-आकाराचा ग्लास स्कायवॉक, काचेचे व्ह्यूइंग पॅनेल्स आणि ३६० अंशांचा व्ह्यूइंग डेक विकसित करण्याची योजना असून यासाठी २ कोटी ५० लाखांची तरतूद सुचवण्यात आली आहे. यासोबतच १ कोटी रुपये खर्चाचे ‘रिव्हर व्ह्यू गार्डन अँड लँडस्केप डेव्हलपमेंट’ साकारण्यात येणार असून, यामध्ये विहंगम डेक, पायवाटा, सावलीतील बैठक व्यवस्था, विश्रांती कक्ष आणि ‘ओझर मिनी नायगारा पॉइंट’, ‘सप्तलिंगी रिव्हर व्ह्यू’ व ‘देवनगरी देवरूख’ असे वैशिष्ट्यपूर्ण फोटो पॉइंट्स तयार केले जाणार आहेत. तसेच पर्यटनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी म्युझिकल फाउंटन, नियंत्रित आकर्षक रोषणाई, स्वतंत्र स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वाहनतळ, अंतर्गत रस्ते, पर्यटन माहिती केंद्र, सीसीटीव्ही यंत्रणा, प्रथमोपचार केंद्र, कचरा व्यवस्थापन आणि सौरऊर्जेचा वापर या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला आहे.

नदीचे नैसर्गिक पात्र, स्थानिक पर्यावरण आणि जैवविविधतेला कोणताही धक्का न लावता हे काम पूर्ण झाल्यास केवळ पावसाळ्यापुरते मर्यादित न राहता हे ठिकाण वर्षभराचे शाश्वत पर्यटन केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यातून स्थानिक युवक, महिला बचत गट आणि शेतकऱ्यांना रोजगाराच्या नव्या संधी मिळून स्थानिक बाजारपेठेला नवी उभारी मिळणार आहे. क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निखिल सुनील कोळवणकर, उपाध्यक्ष इस्तियाक युनूस कापडी, सचिव नंदकिशोर मनोहर बेर्डे, कार्याध्यक्ष नितीन श्रीधर हेगशेट्ये, खजिनदार उदय यशवंत जागुष्टे, सहसचिव संदीप भार्गव वेल्हाळ यांच्यासह संघटनेच्या शिष्टमंडळाने हा प्रस्ताव सादर केला असून, आता प्रशासकीय मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :

5469536
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

अंजणारीतील मृत्यूचा सापळा हटवा, अन्यथा ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन छेडणार; माजी खासदार विनायक राऊत यांचा महामार्ग विभागाला सज्जड इशारा

Gramin Varta
2 Min Read

आंदोलनाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी कायमस्वरूपी कब्जा अयोग्य- सुप्रीम कोर्ट

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी जिल्ह्यात दसऱ्याच्या पूर्वसंध्येला परतीच्या पावसाची हजेरी; भात कापणीच्या हंगामात शेतकऱ्यांची धावपळ, व्यापाऱ्यांची तारांबळ

Gramin Varta
1 Min Read

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीत राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका मोलाची: डॉ. विकास पाटील

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

ब्रेकिंग : माभळेत गणपती विसर्जनावेळी पिता-पुत्र नदीत बुडाले; वाचवण्याच्या प्रयत्नात एका चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

1 Min Read
संगमेश्वर

काजळी नदीवर बंधारे बांधून पाणी अडवले; दाभोळेत संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी माजी सरपंच राजेश रेवाळे यांचा स्तुत्य पुढाकार

2 Min Read
संगमेश्वर

दाभोळे बाजारपेठेत मध्यरात्री दुकानाचे शटर तोडून चोरीचा प्रयत्न; परिसरात खळबळ, व्यापारी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

1 Min Read
संगमेश्वर

फुणगूसमधील शेतविहीर योजनेवरून वाद; १५ दिवसांत न्याय न मिळाल्यास सुभाष लांजेकर आमरण उपोषणाला बसणार

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?