ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: काजळी नदीवर बंधारे बांधून पाणी अडवले; दाभोळेत संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी माजी सरपंच राजेश रेवाळे यांचा स्तुत्य पुढाकार
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » काजळी नदीवर बंधारे बांधून पाणी अडवले; दाभोळेत संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी माजी सरपंच राजेश रेवाळे यांचा स्तुत्य पुढाकार
संगमेश्वर

काजळी नदीवर बंधारे बांधून पाणी अडवले; दाभोळेत संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी माजी सरपंच राजेश रेवाळे यांचा स्तुत्य पुढाकार

Gramin Varta
Last updated: October 10, 2026 1:34 pm
Gramin Varta
156 Views
Share

सिकंदर फरास/दाभोळे: यंदाच्या हंगामात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने भविष्यात उद्भवणाऱ्या तीव्र पाणीटंचाईच्या संकटावर वेळीच मात करण्यासाठी दाभोळे येथे प्रभावी उपाययोजना हाती घेण्यात आली आहे. रवी इन्फ्राच्या सहकार्याने आणि दाभोळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेश रेवाळे यांच्या विशेष पुढाकारातून काजळी नदीच्या पात्रात ठिकठिकाणी तात्पुरते बंधारे बांधून पाणी अडवण्याची मोहीम राबवण्यात आली. संभाव्य पाणीटंचाईची दाहकता ओळखून ऐनवेळी धावपळ करण्यापेक्षा घेतलेल्या या दूरगामी निर्णयाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

पावसाळ्यानंतर नदीतील पाण्याचा प्रवाह कमी झाल्यास पुढील उन्हाळ्यात पिण्याच्या तसेच दैनंदिन वापराच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती होती. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन नदीपात्रात पाणी साठवून ठेवण्यासाठी ही तातडीची मोहीम राबवण्यात आली. काजळी नदीवर ठिकठिकाणी बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यांमुळे मुबलक पाणीसाठा उपलब्ध राहणार असून, भूगर्भातील पाणीपातळी वाढून नदीकाठच्या परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होणार आहे. परिणामी, उन्हाळ्याच्या दिवसांतही परिसरातील गावांचा आणि वाड्यांचा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

या उपक्रमाबाबत माहिती देताना माजी सरपंच राजेश रेवाळे यांनी सांगितले की, या बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवल्यामुळे परिसरातील भूजल पातळी टिकून राहील. याचा थेट फायदा शिवगणवाडी, सांडिमवाडी, बेलकरवाडी, दाभोळे बाजारपेठ, ओमलेवाडी, परडेवाडी आणि जोयशीवाडीसह आजूबाजूच्या विविध वाड्या-वस्त्यांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. या कामाच्या वेळी ग्रामस्थ अंकुश सांडिम हेदेखील उपस्थित होते. ऐन कडक उन्हाळ्यात नागरिकांना आणि जनावरांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागू नये, यासाठी वेळीच राबवलेल्या या जलसंधारण मोहिमेबद्दल दाभोळेसह परिसरातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Total Visitors :

5469380
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

खेड एसटी स्थानकातील अस्वच्छतेविरोधात भाजपा आक्रमक; ‘चिंपाट व टमरेल’ आंदोलनानंतर ॲड. वैभव खेडेकर यांचा प्रशासनाला चार दिवसांचा अल्टिमेटम

Gramin Varta
2 Min Read

पत्रकार तथा बौद्धाचार्य वैभव पवार यांचे १८ ऑक्टोबर रोजी करबुडे येथे धम्मप्रवचन; वर्षावास प्रवचन मालिकेचा होणार समारोप

Gramin Varta
2 Min Read

पाचल येथे महिला शेतकऱ्यांना आंबा-काजू मोहोर संरक्षणाचे शास्त्रीय धडे; ‘आत्मा’च्या प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद

Gramin Varta
2 Min Read

दिवाळीत देशभरात आतापर्यंत ६ लाख कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल : कॅटचा अंदाज

Gramin Varta
6 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

रोमहर्षक सामन्यात मातब्बर रत्नागिरीला नमवून दादासाहेब सरफरे विद्यालयाचा ऐतिहासिक विजय; १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय कबड्डीत पटकावले विजेतेपद

2 Min Read
संगमेश्वर

सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटर, देवरुखच्यावतीने “वसुंधरा ऑलिंपियाड: २०२६”चे आयोजन

3 Min Read
संगमेश्वर

माध्यमिक विद्यालय दाभोळेच्या मुख्याध्यापिका चित्रा कांबळे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न

1 Min Read
संगमेश्वर

देवरुख ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?