दाभोळे (सिकंदर फरास): येथील मुख्य बाजारपेठेत काल मध्यरात्रीच्या सुमारास एका बंद दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरांनी आत प्रवेश करत जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण व्यापारी वर्गात तीव्र अस्वस्थता पसरली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या शांततेचा आणि सुनसान परिसराचा गैरफायदा उठवत अज्ञात चोरट्यांनी एका दुकानाला लक्ष्य केले. चोरांनी दुकानाचे शटर मध्यभागातून बाहेरच्या दिशेने जोरात ओढून उचकटले आणि आत शिरण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र, केवळ दुकानदाराचे नशीब बलवत्तर ठरल्याने चोरांचा हा डाव फसला आणि संभाव्य मोठी वित्तहानी टळून संभाव्य अनर्थ टळला. वर्दळीच्या बाजारपेठेत घडलेल्या या प्रकाराने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, व्यापारी आणि ग्रामस्थांनी अधिक सतर्क राहून खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अद्याप या प्रकरणाची पोलिस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार करण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे.





