ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: भारतात स्टारलिंकसह सर्व कंपन्यांचे स्वागत, सेवांची निवड ग्राहकांच्याच हाती; सरकारने स्पष्ट केली भूमिका
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » भारतात स्टारलिंकसह सर्व कंपन्यांचे स्वागत, सेवांची निवड ग्राहकांच्याच हाती; सरकारने स्पष्ट केली भूमिका
देश-विदेश

भारतात स्टारलिंकसह सर्व कंपन्यांचे स्वागत, सेवांची निवड ग्राहकांच्याच हाती; सरकारने स्पष्ट केली भूमिका

Gramin Varta
Last updated: November 7, 2026 8:13 am
Gramin Varta
Share

दिल्ली: भारताच्या उपग्रह संचार क्षेत्राबाबत केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारतात या क्षेत्रातील सर्व कंपन्यांचे स्वागत असून, अखेरीस ग्राहकच कोणती सेवा निवडायची, हे ठरवतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या क्षेत्रात ग्राहक हाच राजा असून, ग्राहक आपल्या सोयीनुसार किंमत, सेवेचे मूल्य आणि गुणवत्तेच्या आधारे कंपनीची निवड करतील.सध्या भारतात जिओ, वनवेब आणि स्टारलिंक या तीन कंपन्यांकडे उपग्रह संचार सेवा (सॅटकॉम) पुरविण्याचा परवाना आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने परवाना देण्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, एलन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीने या परवान्यासाठी सर्वांत शेवटी अर्ज केला होता आणि तिलाच सर्वांत शेवटी परवाना मिळाला.

सरकारने स्पष्ट केले की, तिन्ही परवानाधारक कंपन्यांना आपली क्षमता सिद्ध करण्यासोबतच निर्धारित सुरक्षा मानकांची पूर्तता करण्यास सांगण्यात आले होते. यामध्ये वनवेबने सर्वप्रथम आवश्यक अनुपालन कागदपत्रे सादर केली. त्यानंतर जिओने आणि सर्वांत शेवटी स्टारलिंकने ही प्रक्रिया पूर्ण केली.

दरम्यान, देशात उपग्रह इंटरनेट सेवा सुरू होण्यासाठी अद्याप दोन महत्त्वाच्या टप्प्यांची पूर्तता होणे बाकी आहे. पहिल्या टप्प्यात सरकारला स्पेक्ट्रमचे वाटप कशा पद्धतीने आणि किती किमतीत करायचे, हे निश्चित करावे लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यात तिन्ही कंपन्यांना सुरक्षेशी संबंधित सर्व आवश्यक अटींची पूर्ण पूर्तता करावी लागेल.

या दोन्ही अटी पूर्ण झाल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणावर उपग्रह इंटरनेट सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे भारताच्या संपूर्ण उपग्रह संचार क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Total Visitors :

5468436
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

लोकसहभागातून नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन केल्यासच टंचाईमुक्ती शक्य : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

Gramin Varta
3 Min Read

गोव्यातील आलिशान व्हिलामधून चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; ४०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात सात जणांना अटक

Gramin Varta
2 Min Read

कडवई रेल्वे स्थानक मार्गाची दुरवस्था; कोकण रेल्वेच्या दुर्लक्षामुळे रिक्षा संघटना आक्रमक, आंदोलनाचा इशारा

Gramin Varta
1 Min Read

संपूर्ण रत्नागिरी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; आमदार प्रमोद जठार यांची महसूलमंत्र्यांकडे आग्रही मागणी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

राहुल गांधींसह १० विरोधी नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

4 Min Read
देश-विदेश

‘अर्णव’ चक्रीवादळाचा धोका वाढला; 5 राज्यांना सतर्कतेचा इशारा

3 Min Read
देश-विदेश

इंटरनेटचा वापर मुलांचा मूलभूत हक्क; वयाच्या आधारावर निर्बंध घालता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

3 Min Read
देश-विदेश

भारतीय हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी; जपानला ४-१ ने नमवून एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं नाव

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?