ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: संपूर्ण रत्नागिरी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; आमदार प्रमोद जठार यांची महसूलमंत्र्यांकडे आग्रही मागणी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » संपूर्ण रत्नागिरी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; आमदार प्रमोद जठार यांची महसूलमंत्र्यांकडे आग्रही मागणी
महाराष्ट्र

संपूर्ण रत्नागिरी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; आमदार प्रमोद जठार यांची महसूलमंत्र्यांकडे आग्रही मागणी

Gramin Varta
Last updated: September 30, 2026 5:09 pm
Gramin Varta
94 Views
Share

मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करून बळीराजाला तातडीने दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी आमदार प्रमोद जठार यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. शासनाने केवळ तीन तालुक्यांपुरतीच ही घोषणा मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्ह्याचा यात समावेश करावा, या मागणीसाठी त्यांनी मंत्रालयात महसूलमंत्र्यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदार सध्या अत्यंत बिकट संकटातून जात असून, फळबागांच्या झालेल्या मोठ्या नुकसानीपोटी शासनाने थेट आणि तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी, याकडे आमदार जठार यांनी लक्ष वेधले. यासोबतच शासकीय नियमांच्या चौकटीत नुकसानभरपाई निश्चित करताना ‘पोटखराबा’ क्षेत्राचाही त्यात समावेश करण्यात यावा, जेणेकरून एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना दुष्काळाच्या काळात आधार देण्यासाठी जिल्ह्यातील १०० टक्के पात्र लाभार्थ्यांना रेशनवरील अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत करावा आणि रोहयो (मनरेगा) कामांना गती देण्यासाठी जाचक ठरत असलेली जिओटॅगिंगची अट तात्काळ शिथिल अथवा रद्द करावी, या मागण्यांवरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोकणातील या गंभीर स्थितीची दखल घेत निवेदनातील मागण्यांवर शासन सकारात्मक विचार करून लवकरच योग्य निर्णय घेईल, असा विश्वास दिला. दरम्यान, रत्नागिरीतील शेतकरी, कष्टकरी आणि बागायतदारांच्या न्याय्य हक्कांसाठी हा लढा सुरूच राहील आणि शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करून दुष्काळग्रस्त जनतेला न्याय मिळवून दिला जाईल, असा निर्धार आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी व्यक्त केला.

Total Visitors :

5435609
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरीत आकाशप्रेमींनी अनुभवला अद्भुत खगोलीय सोहळा; चंद्रामागे लपला तेजस्वी शुक्र

Gramin Varta
1 Min Read

A Close-Up on Trailblazing Startups and Their Journeys

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

संगमेश्वरच्या चार एक्सप्रेससाठी ‘उंदीरमामा’ मैदानात!

Gramin Varta
1 Min Read

राजापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पाचलच्या सरस्वती विद्यामंदिरचे अजिंक्यपद

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

अपुऱ्या पावसामुळे गंभीर परिस्थिती : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

3 Min Read
महाराष्ट्र

रेनो ट्रायबरमध्ये आता टर्बो पेट्रोल इंजिन; १०० पीएस पॉवरसह नवीन मॉडेल लाँच

3 Min Read
महाराष्ट्र

दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

2 Min Read
महाराष्ट्र

रोजगार महाकुंभ महाराष्ट्रला नवी बळकटी; राज्य कौशल्य विकास सोसायटी-सृजन ट्रस्टमध्ये सामंजस्य करार

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?