ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दहावी-बारावीच्या परीक्षांचे बिगुल वाजले; राज्य मंडळाकडून संभाव्य तारखांचा कालावधी जाहीर
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दहावी-बारावीच्या परीक्षांचे बिगुल वाजले; राज्य मंडळाकडून संभाव्य तारखांचा कालावधी जाहीर
महाराष्ट्र

दहावी-बारावीच्या परीक्षांचे बिगुल वाजले; राज्य मंडळाकडून संभाव्य तारखांचा कालावधी जाहीर

Gramin Varta
Last updated: September 18, 2026 8:25 am
Gramin Varta
68 Views
Share

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या मुख्य परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जाहीर कालावधीनुसार बारावीची लेखी परीक्षा आठ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, दहावीच्या लेखी परीक्षेला १५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होईल. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी यासंदर्भातील परीक्षांच्या तारखांची घोषणा करत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे.

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊही विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १६ मार्च या कालावधीत चालेल, तर त्यापूर्वी २० जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा घेतल्या जातील. त्याचप्रमाणे दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते ११ मार्चदरम्यान होणार असून, त्यांच्या प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत पूर्ण कराव्या लागतील.

लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या विषयानुसार तपशीलवार अंतिम वेळापत्रक राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षांचे वेळापत्रक समोर आल्यामुळे आता राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी गतिमान केली आहे.

Total Visitors :

5427501
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चार महिन्याच्या चिमुकलीला उघड्यावर सोडून स्वप्नील गेला; बापाच्या मायेसाठी लेकीची नजर भिरभिरतेय…

Gramin Varta
3 Min Read

विद्युत अपघातात जनावरे दगावल्यास आता ५० हजारांची मदत; महावितरणकडून नुकसानभरपाईच्या रक्कमेत घसघशीत वाढ

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी : सैतवडे पेठ मोहल्ला येथे आईच्या आजारपणाच्या चिंतेत तरुणाने जीवन संपविले

Gramin Varta
2 Min Read

Discovering the Next Wave of Game-Changing Startups

You Might Also Like

महाराष्ट्र

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या तपासाची धुरा ‘गोल्ड मेडलिस्ट’ सीमा पाहूजा यांच्याकडे; सीबीआयकडून जुन्या कागदपत्रांची नव्याने झाडाझडती सुरू

3 Min Read
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या लोककलेचा तेजस्वी तारा निखळला; ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन

2 Min Read
महाराष्ट्र

बीआयएसने सोन्याच्या हॉलमार्किंग शुल्कात ७५ रुपयांपर्यंत केली वाढ, नवीन दर लागू

2 Min Read
महाराष्ट्र

गणपतीसाठी कोकण गाठताना चाकरमान्यांची परीक्षा; रेल्वे गाड्या ११ ते १२ तास उशिराने, प्रवाशांचा संताप

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?