ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: कोयना खोऱ्यात मध्यरात्री भूकंपाचे पाच सौम्य धक्के
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » कोयना खोऱ्यात मध्यरात्री भूकंपाचे पाच सौम्य धक्के
महाराष्ट्र

कोयना खोऱ्यात मध्यरात्री भूकंपाचे पाच सौम्य धक्के

Gramin Varta
Last updated: September 24, 2026 8:11 am
Gramin Varta
39 Views
Share

सातारा ( प्रतिनिधी): महाराष्ट्राची भाग्यरेषा मानल्या जाणाऱ्या कोयना धरण परिसराला मंगळवारी मध्यरात्री साडेबारा ते पहाटे चार या अवघ्या साडेतीन तासांच्या कालावधीत भूकंपाच्या सलग पाच सौम्य धक्क्यांनी हलवून सोडले. रिश्टर स्केलवर २ ते २.५ एवढी नोंद असलेल्या या भूकंपांची तीव्रता कमी असल्याने नागरिकांना ते फारसे जाणवले नाहीत आणि कोणतीही वित्त अथवा जीवितहानी झालेली नाही. या धक्क्यांमुळे धरणाला कसलाही धोका पोहोचलेला नसून ते पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र, ऐन संवेदनशील काळात कोयनानगर येथील मुख्य भूकंपमापन केंद्र तांत्रिक कारणास्तव बंद असल्याची गंभीर बाब समोर आल्याने धक्क्यांची खोली आणि अक्षांश-रेखांशासह अचूक तपशील मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे.

भूकंप प्रवण क्षेत्रात मोडणाऱ्या कोयना धरण खोऱ्यामध्ये धरणाच्या उभारणीपासून आजतागायत लहान-मोठ्या लाखो भूकंपांची नोंद झाली असून, ३ रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रता असल्यावरच हे हादरे प्रकर्षाने जाणवतात. मंगळवारी मध्यरात्री १२.३० वाजता २.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला धक्का नोंदवला गेला. त्यानंतर एका तासाने म्हणजेच दीड वाजता २.३ तीव्रतेचा दुसरा धक्का बसला. मध्यरात्रीनंतर पहाटेच्या सुमारास ही मालिका सुरूच राहिली; ज्यात सव्वातीन वाजता २.२, त्यानंतर पंधराच मिनिटांनी २.५ आणि शेवटी पहाटे ४ वाजता २.१ रिश्टर स्केल क्षमतेचा पाचवा धक्का बसला. या सर्व हादऱ्यांचा केंद्रबिंदू साताऱ्यापासून साधारणपणे ५० ते ५२ किलोमीटर अंतरावर एकवटलेला होता.

ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत कोयना खोऱ्यात भूकंपाची ही मालिका झाल्याची माहिती समोर येताच पाटण तालुक्यासह संपूर्ण परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तथापि, सुदैवाने पाटण तालुक्यात किंवा धरण पाणलोट क्षेत्रात कुठेही पडझड अथवा नुकसानीची नोंद झालेली नाही. दरम्यान, कोयना खोऱ्यात भूकंप झाल्यास कोयनानगर, सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही केंद्रांवरील नोंदींच्या आधारे भूकंपाचे अंतर, जमिनीखालील अचूक खोली आणि अक्षांश-रेखांश निश्चित केले जातात. परंतु कोयनानगरचे केंद्र बंद असल्याने या पाचही धक्क्यांच्या सखोल नोंदी तात्काळ उपलब्ध होऊ शकल्या नाहीत, असे कोयनेच्या भूकंप मापन केंद्रातील अधिकारी किरण कानुगडे यांनी स्पष्ट केले आहे.

Total Visitors :

5427501
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवात बाजारपेठेत १०० कोटींहून अधिक रकमेची आर्थिक उलाढाल

Gramin Varta
2 Min Read

Profiling the Visionaries Behind Cutting-Edge Startup Ventures

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

AI Unleashed Exploring the Future of Machine Learning and Robotics

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

जैतापूर येथे भरधाव कारची समोरून धडक; दोन्ही वाहनांचे नुकसान

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

दिशा सालियन प्रकरणात सीबीआयच्या एफआयआरनंतर नवा कायदेशीर संघर्ष; सतीश सालियन थेट ‘मातोश्री’वर बजावणार मानहानीची नोटीस

3 Min Read
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या गृहनिर्माण क्षेत्राला नवी दिशा देणार – संजीव जयस्वाल

3 Min Read
महाराष्ट्र

अपुऱ्या पावसामुळे गंभीर परिस्थिती : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

3 Min Read
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणात ७० वर्षीय नराधमाला फाशीची शिक्षा

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?