ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड बंधनकारक; मंदिर परिसरात जनजागृतीपर फलक
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड बंधनकारक; मंदिर परिसरात जनजागृतीपर फलक
रत्नागिरी

गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड बंधनकारक; मंदिर परिसरात जनजागृतीपर फलक

Gramin Varta
Last updated: September 17, 2026 1:29 pm
Gramin Varta
36 Views
Share

गणपतीपुळे/वैभव पवार : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणपती मंदिरात १ जानेवारी २०२७ पासून भाविकांसाठी वस्त्रसंहिता अर्थात ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आला आहे. यासंदर्भातील सूचना फलक संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या वतीने मंदिर परिसरात लावण्यात आले असून, वस्त्रसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा अंतिम निर्णय संस्थानने घेतला आहे.

संस्थानकडून यापूर्वीही मंदिर परिसरात वस्त्रसंहितेबाबत जनजागृतीपर सूचना फलक लावण्यात आले होते. आता १ जानेवारी २०२७ पासून या नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे. श्रींच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करताना भारतीय परंपरा आणि मंदिराच्या धार्मिक वातावरणाला साजेसा पोशाख परिधान करणे भाविकांना आवश्यक राहणार आहे.

मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, मंदिर हे सर्वांचे श्रद्धास्थान असल्याने समुद्रकिनारी फिरण्यासाठी किंवा पर्यटनासाठी वापरला जाणारा कमी कपड्यांचा पेहराव करून मंदिरात प्रवेश करू नये. गुडघ्याच्या वर येणारे स्कर्ट किंवा ड्रेस तसेच असभ्य भाषा किंवा आक्षेपार्ह चित्रे असलेले कपडे परिधान करणे टाळावे. अशा प्रकारची वेशभूषा असलेल्या भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याचेही सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. याबाबत मंदिर प्रशासनाशी वाद घालू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

दरम्यान, दहा वर्षांखालील मुलांना या वस्त्रसंहितेच्या नियमातून सूट देण्यात आली आहे. श्रींच्या दर्शनासाठी गणपतीपुळ्यात येणाऱ्या सर्व भाविकांनी वस्त्रसंहितेची नोंद घेऊन मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या पंच कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

महाराष्ट्रात दुष्काळी संकटावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत; केंद्राची वाट न पाहता राज्य शासन मदत देणार

Gramin Varta
3 Min Read

IRCTCचा मोठा दणका! ९ कोटींहून अधिक संशयास्पद खात्यांवर कारवाई; रेल्वे तिकीट काळाबाजाराला लगाम

Gramin Varta
3 Min Read

A Close-Up on Trailblazing Startups and Their Journeys

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

Apple Pay Celebrates Milestone: Surpasses X Billion Transactions Mark

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी शहरात अमली पदार्थविरोधी कारवाई; हेरॉईनसदृश पदार्थासह दोघे ताब्यात

3 Min Read
रत्नागिरी

राजीवडा समुद्रात महाकाय लाटेच्या तडाख्याने नौका उलटली; आठ मच्छीमार बचावले

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत २७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा होणार

2 Min Read
रत्नागिरी

नळपाणी योजनांची धुरा महिला बचत गटांच्या हाती; रत्नागिरी जिल्हा परिषदेचा पथदर्शी प्रयोग, शंभर टक्के पाणीपट्टी वसुलीने रचला आदर्श

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?