ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी : दुचाकी न दिल्याने तरुणाला काठीने मारहाण; एकावर गुन्हा दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी : दुचाकी न दिल्याने तरुणाला काठीने मारहाण; एकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी

रत्नागिरी : दुचाकी न दिल्याने तरुणाला काठीने मारहाण; एकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
Last updated: October 16, 2026 4:36 pm
Gramin Varta
213 Views
Share

रत्नागिरी : दुचाकी गाडी न दिल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीने कर्मचाऱ्याला काठीने डोक्यावर मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शहरातील आठवडा बाजार परिसरात घडली. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले असून संशयित आरोपीविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांडा येथील रहिवासी असलेले व सध्या रहाटाघर एसटी स्टँड परिसरात राहणारे संतोष भोजू राठोड (वय ४१) हे १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आठवडा बाजारातील देशी बारसमोर थांबले होते. त्यावेळी संशयित आरोपी दीपक राठोड याने संतोष यांच्याकडे त्यांची दुचाकी मागितली. संतोष यांनी दुचाकी देण्यास नकार दिल्याने संशयिताचा पारा चढला. संशयित आरोपीने संतोष यांच्या डाव्या डोळ्याच्या वर काठीने जोरदार प्रहार करून त्यांना जखमी केले.

मारहाण केल्यानंतर संशयिताने ‘तू ड्युटी कशी करतोस तेच बघतो’ अशी धमकी देत जीवे मारण्याचा दम भरला. एवढ्यावरच न थांबता रस्त्यावर उभी करून ठेवलेल्या दुचाकीला लाथ मारून तिचे नुकसान केले तसेच या घटनेतील साक्षीदारालाही फोनवरून धमकावले. या प्रकारानंतर संतोष राठोड यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी दीपक राठोड याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ३५१(२), ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5468552
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात भीषण अपघात; केमिकल टँकर २५० फूट दरीत कोसळला, चालक सुखरूप बचावला

Gramin Varta
2 Min Read

‘आंदोलन अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचणार’- राहुल गांधी

Gramin Varta
2 Min Read

बलशाली लोकशाहीसाठी तरुणाईची नवमतदार नोंदणी गरजेची : संजय पवार

Gramin Varta
3 Min Read

रत्नागिरीत लाइट हाऊस ते हनुमान स्टॉपदरम्यान अ‍ॅक्टिव्हाचा भीषण अपघात; उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरीत भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात प्रगत ‘एएलएच एमके-३’ दाखल; पश्चिम किनारपट्टीची सुरक्षा अधिक भक्कम

2 Min Read
रत्नागिरी

माध्यमिक विद्यालय वरवडे येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

2 Min Read
रत्नागिरी

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज; रत्नागिरी शासकीय विश्रामगृहात समन्वयकांच्या उपस्थितीत खलबते

1 Min Read
रत्नागिरी

बालक व किशोरांच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम प्रभावीपणे राबवा; रत्नागिरीत तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?