ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: बलशाली लोकशाहीसाठी तरुणाईची नवमतदार नोंदणी गरजेची : संजय पवार
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » बलशाली लोकशाहीसाठी तरुणाईची नवमतदार नोंदणी गरजेची : संजय पवार
राजापूर

बलशाली लोकशाहीसाठी तरुणाईची नवमतदार नोंदणी गरजेची : संजय पवार

Gramin Varta
Last updated: September 30, 2026 3:29 pm
Gramin Varta
17 Views
Share

खापणे महाविद्यालयातील नवमतदार नोंदणी अभियान संपन्न

पाचल (अंकुश पोटले) : लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम आणि बलशाली करण्यासाठी तरुणाईचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक युवक-युवतीने मतदार यादीत आपले नाव नोंदवून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन पाचलचे मंडळ अधिकारी संजय पवार यांनी केले.

श्री. मनोहर हरी खापणे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित ‘एनएसएस सप्ताहा’अंतर्गत ‘नवमतदार नाव नोंदणी अभियान’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी दीपक सोनवणे, ग्राम महसूल अधिकारी सूर्यकांत लांडगे, लक्ष्मण नरके, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विकास पाटील, प्रा. एस. जी. चव्हाण, बीएलओ तथा अंगणवाडी सेविका रिद्धी लिंगायत, सिद्धी निखार्गे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संजय पवार म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून मतदार यादीच्या विशेष पुनर्पडताळणीचे काम सुरू आहे. जुन्या मतदारांच्या नोंदींची पडताळणी करण्याबरोबरच नाव, पत्ता, गाव आदी तपशीलांमध्ये झालेल्या बदलांची दुरुस्ती केली जात आहे. या प्रक्रियेसोबतच नव्या मतदारांची नोंदणी होणेही तितकेच आवश्यक आहे. काही कारणांमुळे १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक-युवतींची मतदार नोंदणी अद्याप झाली नसेल, तर त्यांनी ती तातडीने करून घ्यावी. परंपरागत मतदारांसोबत नव्या पिढीचा लोकशाही प्रक्रियेतील सहभाग वाढल्यास लोकशाही अधिक सक्षम होईल. त्यामुळे तरुणाईने स्वतःची तसेच आपल्या परिसरातील १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवतींची मतदार नोंदणी करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि नवमतदार नोंदणीची चळवळ उभी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकातून डॉ. विकास पाटील यांनी नवमतदार नोंदणी अभियानाचा उद्देश व स्वरूप स्पष्ट केले. दीपक सोनवणे व सूर्यकांत लांडगे यांनीही आपल्या मनोगतातून नवमतदार नोंदणीचे महत्त्व विशद केले.

अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय्य हक्कांबाबत सदैव जागरूक राहण्याचे आवाहन केले. लोकशाहीने नागरिकांना दिलेला मतदानाचा अधिकार हे प्रभावी लोकशाही सहभागाचे महत्त्वाचे साधन असून, हा अधिकार बजावण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने मतदार म्हणून आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच आपल्या परिसरातील नागरिकांनाही नवमतदार नोंदणी अभियानात सहभागी करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. एस. जी. चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी बीएलओ तथा अंगणवाडी सेविका रिद्धी लिंगायत व सिद्धी निखार्गे यांनी नवमतदारांकडून आवश्यक कागदपत्रांसह नमुना क्रमांक ६ भरून घेतला. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

ग्राहक चळवळीत सहभागी होण्यासाठी ग्राहक पंचायत कार्यात सहभाग घ्यावा : सत्यवान कोत्रे

Gramin Varta
2 Min Read

मुंबई – मडगांव आणि मुंबई – नागपूर दरम्यान ८ साप्ताहिक विशेष गाड्या

Gramin Varta
2 Min Read

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ४४१.४३ कोटींच्या १०० टक्के खर्चाला मंजुरी

Gramin Varta
5 Min Read

राज्यात २० ते २५ सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

राजापूर

राजापूर : भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला समोरासमोर धडक; स्कुटीस्वार तरुण गंभीर जखमी

2 Min Read
राजापूर

नाटे परिसरात भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

1 Min Read
राजापूर

राजापूर : आडिवऱ्यात नवरात्रोत्सवानिमित्त राज्यस्तरीय सोलो व ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा

1 Min Read
राजापूर

राजापुरात चुलत्याला शिवीगाळ करत पुतण्याकडून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?