ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: माध्यमिक विद्यालय वरवडे येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Sunday, Oct 4, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » माध्यमिक विद्यालय वरवडे येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
रत्नागिरी

माध्यमिक विद्यालय वरवडे येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

Gramin Varta
Last updated: October 3, 2026 8:19 am
Gramin Varta
68 Views
Share

गणपतीपुळे (वैभव पवार): सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाच्या बळावर देशाला दिशा देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे मूर्तिमंत प्रतीक असलेले देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती वरवडे येथील माध्यमिक विद्यालयात अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. नम्रता सावंत यांच्या अध्यक्षतेखाली हा संयुक्त जयंती सोहळा पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थी आर्यन मेढेकर आणि निसर्गा बारगीर यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे विधीवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर प्रशालेतील विद्यार्थिनी साधना पावसकर, तनया चौगुले, स्वरा जाक्कर, सानिका महाडिक आणि तनिष्का साळवी यांनी या दोन्ही थोर महामानवांच्या जीवनप्रवासावर आणि ऐतिहासिक योगदानावर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तथा सहाय्यक शिक्षक विश्वनाथ चिले यांनी आपल्या भाषणात महात्मा गांधी यांच्या बालपणापासून ते शिक्षणापर्यंतचा काळ, त्यांची स्वभाववैशिष्ट्ये आणि सत्य-अहिंसेच्या माध्यमातून त्यांनी उभारलेल्या सामाजिक व राष्ट्रीय लढ्याचा सविस्तर आढावा घेतला. आजच्या आधुनिक काळातही गांधीवादी विचारांची नितांत गरज असून विद्यार्थ्यांनी सत्य, अहिंसा आणि प्रामाणिकपणा ही जीवनमूल्ये दैनंदिन आचरणात आणावीत, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात सौ. नम्रता सावंत यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या अलौकिक कार्यावर प्रकाश टाकला. शास्त्रीजींची साधी राहणी, उत्तुंग विचार, अतुलनीय कर्तव्यनिष्ठा, कणखर नेतृत्व, प्रामाणिकपणा आणि संकटाच्या क्षणी दाखवलेले प्रसंगावधान या गुणांचा गौरव करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनमूल्यांची प्रेरणा स्वतःच्या आयुष्यात जोपासावी, असा मोलाचा सल्ला दिला.

कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख संदीप जंगम यांनी केले. या प्रेरणादायी जयंती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक शिवाजी जगताप आणि पर्यवेक्षक आनंद पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitors :

5435570
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

10 Tech Innovations Set to Reshape the World As We Know It

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

साखरपा बसस्थानकात एसटीच्या चाकाखाली तरुण सापडला; पायावरून चाक गेले

Gramin Varta
1 Min Read

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तातही चिपळूण पोलिसांची कर्तव्यतत्परता; रिक्षाचालकाचा हरवलेला मोबाईल शोधून केला सुपूर्द

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाचा उद्या ज्येष्ठ नागरिक दिन

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी रेल्वेस्थानकावर एटीव्हीएम यंत्र दाखल; प्रवाशांची तिकीट खिडकीवरील लांबलचक रांगांमधून कायमची सुटका

2 Min Read
रत्नागिरी

खेडशी परिसरात ट्रॅव्हल्सची मोकाट वासराला धडक; नागरिक, पोलिस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेने मुक्या जीवाला जीवदान

2 Min Read
रत्नागिरी

Latest Trends and Insights in Shaping Industries for the Future

रत्नागिरी

गणपतीपुळे परिसरासाठी पुढील २५ वर्षांचा विकास आराखडा करा; वैभव घाग यांची पालकमंत्री उदय सामंतांकडे मागणी

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?