ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी: स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मच्छिमारांचे प्राण वाचवणाऱ्या ७ जणांचा सत्कार
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी: स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मच्छिमारांचे प्राण वाचवणाऱ्या ७ जणांचा सत्कार
रत्नागिरी

रत्नागिरी: स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मच्छिमारांचे प्राण वाचवणाऱ्या ७ जणांचा सत्कार

Gramin Varta
Last updated: September 22, 2026 1:27 pm
Gramin Varta
294 Views
Share

रत्नागिरी: भाट्ये ते मांडवी दरम्यान समुद्रात अचानक आलेल्या अजस्त्र लाटांमुळे जुवेब हुश्ये यांची फिशिंग बोट पलटी होऊन सात मच्छिमार संकटात सापडले. समुद्रातील परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही राजिवडा येथील मच्छिमार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत जीवाची पर्वा न करता समुद्रात धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर सातही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या धाडसी आणि मानवतावादी कार्याबद्दल या जीवरक्षक मच्छिमारांचा विशेष सत्कार करण्यात आला.

भाट्ये ते मांडवीदरम्यान समुद्रात मासेमारी सुरू असताना अचानक आलेल्या प्रचंड लाटांचा जोरदार तडाखा बसल्याने जुवेब हुश्ये यांची फिशिंग बोट पलटी झाली. बोटवरील मच्छिमार समुद्रात संकटात सापडल्याची माहिती मिळताच राजिवडा परिसरातील मच्छिमार मदतीसाठी तातडीने समुद्रात उतरले. अजमल उर्फ अज्जु हुनेरकर आणि खालिद होडेकर यांच्या ‘सुरैय्या’ बोटीसह रजिन हुनेरकर यांच्या ‘अनाबिया’ बोटीवरील मच्छिमारांनी बचावकार्य सुरू केले.

समुद्रातील लाटांचा वाढता जोर, बोटींची हालचाल आणि निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती याची पर्वा न करता अजमल (अज्जु) हुनेरकर, खालिद होडेकर, कैफ होडेकर, यास्मिन पावसकर, माई पाटील, अफान वस्ता, खालिद मजगावकर तसेच ‘अनाबिया’ बोटीवरील शहबाज वस्ता आणि अरमान हुनेरकर यांनी बचावकार्यामध्ये धाडसाने सहभाग घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे समुद्रात अडकलेल्या सातही मच्छिमारांचे प्राण वाचले.

संकटाच्या प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचविणाऱ्या या मच्छिमारांच्या धाडसाचे परिसरातून कौतुक होत आहे. त्यांच्या या साहसाची दखल घेत नगरसेवक अमित विलणकर, मुकुंद विलणकर, साई खेऊर आणि फैयाज हुनेरकर यांनी त्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देत या धाडसी मच्छिमारांचा गौरव केला. समुद्रातील संकटसमयी मदतीचा हात पुढे करून सात जणांना जीवदान देणाऱ्या या मच्छिमारांनी माणुसकी आणि धाडसाचे उदाहरण घालून दिले आहे.

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

शंभर वर्षांनंतर मांजराच्या नव्या प्रजातीचा शोध

Gramin Varta
2 Min Read

Navigating Intelligent Strategies Beyond Smart Solutions

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

एकल महिलांच्या सर्वेक्षणाला १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Gramin Varta
1 Min Read

किल्ले रायगडावर हत्ती तलाव परिसरात पाय घसरून पडल्याने  पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी: मुरुगवाड्यात विक्रीच्या उद्देशाने हेरॉईन बाळगणारा २२ वर्षीय तरुण ताब्यात

1 Min Read
रत्नागिरी

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात रत्नागिरीचे प्रथमेश गवाणकर उच्च न्यायालयात; कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल

1 Min Read
रत्नागिरी

मिरकरवाडा बंदरात मत्स्य विभागाची धडक कारवाई; विनावापर पडून असलेल्या ३० नौका हटवण्यास सुरुवात

2 Min Read
रत्नागिरी

राजीवडा समुद्रात महाकाय लाटेच्या तडाख्याने नौका उलटली; आठ मच्छीमार बचावले

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?