ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीत १ किलो २९१ ग्रॅम गांजा जप्त; ८० हजारांच्या मुद्देमालासह तरुण ताब्यात
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीत १ किलो २९१ ग्रॅम गांजा जप्त; ८० हजारांच्या मुद्देमालासह तरुण ताब्यात
रत्नागिरी

रत्नागिरीत १ किलो २९१ ग्रॅम गांजा जप्त; ८० हजारांच्या मुद्देमालासह तरुण ताब्यात

Gramin Varta
Last updated: November 9, 2026 9:42 am
Gramin Varta
140 Views
Share

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील काझी चाळ, उद्यमनगर परिसरात पोलिसांनी कारवाई करत तब्बल १ किलो २९१ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या गांजाची एकूण किंमत ८० हजार १०० रुपये असून, अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने तो जवळ बाळगल्याप्रकरणी एका २७ वर्षीय तरुणाविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल समीर सोलकर (वय २७, रा. मराठी शाळेजवळ, कोकणनगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. ८ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.३३ वाजण्याच्या सुमारास काझी चाळ, उद्यमनगर, रत्नागिरी येथे ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत संशयिताकडून हिरव्या-काळ्या रंगाचा उग्र वास असलेला गांजा जप्त करण्यात आला. त्यामध्ये एका पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीत काळ्या रंगाच्या चिकट पट्टीने गुंडाळून ठेवलेला ९१० ग्रॅम गांजा आढळला. त्याची किंमत ६० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच निळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीत ३८१ ग्रॅम गांजा आढळून आला असून, त्याची किंमत २० हजार रुपये आहे. याशिवाय गांजा ठेवण्यासाठी वापरलेल्या पिशव्या आणि काळ्या रंगाची प्रवासी बॅग असा मुद्देमालही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६३/२०२६ अन्वये एन.डी.पी.एस. कायदा १९८५ मधील कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजेश भास्करराव भुजबळ (वय ५५) यांनी फिर्याद दिली आहे.

शहरातील उद्यमनगर परिसरात झालेल्या या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यवहाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या गांजाचा पुरवठा नेमका कुठून झाला आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.

Total Visitors :

5468537
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

घाटीवळे आणि करंजारीत एकाच रात्री पाच घरे फोडली; चोरट्यांच्या सुळसुळाटामुळे परिसरात तीव्र घबराट

Gramin Varta
2 Min Read

कारवली गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी माजी सरपंच गणेश वरेकर यांची बिनविरोध निवड

Gramin Varta
1 Min Read

जैतापूर येथे भरधाव कारची समोरून धडक; दोन्ही वाहनांचे नुकसान

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरी-पावस मार्गावर धावत्या कारला भीषण आग; ६ प्रवासी सुखरूप, अग्निशामक दलाच्या दिरंगाईमुळे कार जळून खाक

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी: शिरगावात अज्ञात चारचाकीच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी; धडक देऊन चालक पसार

2 Min Read
रत्नागिरी

ब्रेकिंग:रत्नागिरी जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलमुळे पोलीस यंत्रणा सतर्क

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत ६० हजार रुपयांच्या गांजासह एकजण ताब्यात

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात प्रगत ‘एएलएच एमके-३’ दाखल; पश्चिम किनारपट्टीची सुरक्षा अधिक भक्कम

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?