ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी प्रसिद्ध; राज्यातील ३.५१ लाख शेतकऱ्यांना दिलासा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी प्रसिद्ध; राज्यातील ३.५१ लाख शेतकऱ्यांना दिलासा
रत्नागिरी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी प्रसिद्ध; राज्यातील ३.५१ लाख शेतकऱ्यांना दिलासा

Gramin Varta
Last updated: October 13, 2026 3:37 pm
Gramin Varta
67 Views
Share
Money bag on the background of agricultural crops in the hand of the farmer. Agricultural startups. Profit from agribusiness. Lending and subsidizing farmers. Rupee, rupiah. Grants and support.

रत्नागिरी: राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची ३.५१ लाख शेतकऱ्यांचा समावेश असलेली बहुप्रतिक्षित तिसरी यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीतील शेतकऱ्यांनी प्रमाणीकरणाची प्रक्रिया विनाविलंब पूर्ण केल्यास कर्जमुक्तीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली जाणार असून, सर्व पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या केंद्रांवर जाऊन ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी यांनी केले आहे. या योजनेनुसार १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत राहिलेल्या आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पीक व पुनर्गठित कर्जास २ लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्जमाफी दिली जात आहे.

विविध बँकांनी महाआयटी पोर्टलवर नोंदवलेल्या एकूण ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची संगणकीय तपासणी केल्यानंतर टप्प्याटप्प्याने याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. यापूर्वी २४ जुलै २०२६ रोजी पहिल्या टप्प्यात १६.९६ लाख आणि ११ सप्टेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात ४.२० लाख शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या ३.५१ लाख शेतकऱ्यांच्या तिसऱ्या यादीसह आतापर्यंत राज्यातील एकूण २४.६७ लाख शेतकरी या कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले आहेत.

ही योजना संपूर्ण कर्जमुक्तीची असून ३१ मार्च २०२६ नंतर आकारण्यात आलेले सर्व व्याज व अतिरिक्त खर्च पूर्णपणे माफ करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अथवा ग्रामपंचायतींमध्ये लावण्यात आलेल्या यादीतून ३१ मार्च २०२६ अखेरच्या थकबाकीची खातरजमा करून घ्यावी आणि नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’वर जाऊन आपली ओळख पडताळणी पूर्ण करावी. राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांमधील ज्या शेतकऱ्यांची थकबाकी दोन लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांची खाती शासनाच्या विशेष ‘हेअर कट’ धोरणानुसार निरंक केली जाणार आहेत. याशिवाय मयत शेतकरी, वयोवृद्ध नागरिक अथवा बायोमेट्रिक अडचणी असलेल्या व्यक्तींसाठी १९ ऑगस्ट २०२६ च्या शासन निर्णयानुसार लागू केलेल्या विशेष कार्यप्रणालीद्वारे दिलासा देण्यात आला असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Total Visitors :

5468411
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

पावसाअभावी दाभोळे परिसरात नुकसान झालेल्या भातशेतीचे कृषी अधिकाऱ्यांकडून बांधावर जाऊन पंचनामे सुरू

Gramin Varta
1 Min Read

एमबीबीएस व बीडीएस प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर; ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना संधी, १४ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश निश्चित करण्याचे सीईटी कक्षाचे निर्देश

Gramin Varta
2 Min Read

गणपती सजावटीदरम्यान विजेचा धक्का; संगमेश्वरातील ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

माध्यमिक विद्यालय दाभोळे येथे विद्यार्थ्यांना देण्यात आली प्रदूषण मुक्त दीपावलीची शपथ

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी : कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

2 Min Read
रत्नागिरी

श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे सामवेद स्वाहाकार सोहळा भक्तिभावात संपन्न; भाविकांच्या उपस्थितीत पूर्णाहूती

2 Min Read
रत्नागिरी

राजस्थान रॉयल्सचे रोमी भिंडर आणि आलोक चित्रे उद्या रत्नागिरीत

2 Min Read
रत्नागिरी

तब्बल ३४ वर्षांनंतर फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या; रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेची कर्नाटकात धडक कारवाई, ‘RAIDS App’ ठरले तपासात महत्त्वाचे

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?