ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: गणपती सजावटीदरम्यान विजेचा धक्का; संगमेश्वरातील ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » गणपती सजावटीदरम्यान विजेचा धक्का; संगमेश्वरातील ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू
संगमेश्वर

गणपती सजावटीदरम्यान विजेचा धक्का; संगमेश्वरातील ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Gramin Varta
Last updated: September 16, 2026 11:22 am
Gramin Varta
47 Views
Share

संगमेश्वर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरात गणपती सजावटीचे काम करत असताना विजेचा तीव्र धक्का लागल्याने संगमेश्वर तालुक्यातील मुरडव-सुतारवाडी येथील ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सुहास विष्णू केळकर असे मृत तरुणाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मुरडव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास सुहास केळकर हे आपल्या घरात गणपती सजावटीचे काम करत होते. सजावटीसाठी विद्युत रोषणाईचे तोरण लावत असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. विजेचा धक्का लागल्याने ते खाली कोसळले.

घटनेनंतर त्यांचे भाऊ स्वप्निल विष्णू केळकर यांनी तातडीने सुहास यांना वाहनातून आरवली येथील डॉ. भायजे यांच्याकडे उपचारासाठी नेले. प्राथमिक तपासणीनंतर अधिक उपचारासाठी त्यांना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सुहास केळकर यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

या घटनेची नोंद संगमेश्वर पोलिस ठाण्यात बीएनएसएस कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, आमृ क्रमांक ३८/२०२६ अशी नोंद आहे. गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने मुरडव-सुतारवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे.

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राजीवडा समुद्रात महाकाय लाटेच्या तडाख्याने नौका उलटली; आठ मच्छीमार बचावले

Gramin Varta
2 Min Read

लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी महाराष्ट्रासह देश-विदेशात जय्यत तयारी

Gramin Varta
4 Min Read

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: भारतीय महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा १७-१ ने उडवला धुव्वा

Gramin Varta
3 Min Read

देवरुख: आंबव हनुमान स्टॉपजवळ गांजा सेवन करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

दाभोळेत भक्तिमय वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप

1 Min Read
संगमेश्वर

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची देशभरात ‘महामोहीम’; संगमेश्वर तालुक्यातील बामणोली गावाची विशेष निवड

2 Min Read
संगमेश्वर

चार महिन्याच्या चिमुकलीला उघड्यावर सोडून स्वप्नील गेला; बापाच्या मायेसाठी लेकीची नजर भिरभिरतेय…

3 Min Read
संगमेश्वर

Unraveling the Complexities of the Human Mind and Behavior

7 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?