ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: कडवईचे माजी सरपंच वसंत उजगावकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » कडवईचे माजी सरपंच वसंत उजगावकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
संगमेश्वर

कडवईचे माजी सरपंच वसंत उजगावकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Gramin Varta
Last updated: September 28, 2026 7:34 pm
Gramin Varta
222 Views
Share

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावचे माजी सरपंच, शिवसेनेचे विभागप्रमुख तथा पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सचिव वसंत उजगावकर यांचे सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने कडवईसह पंचक्रोशी परिसरावर शोककळा पसरली असून सामाजिक व राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

वसंत उजगावकर यांनी सामाजिक कार्याला नेहमीच प्राधान्य देत सर्वसामान्यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. ‘जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ या भावनेतून काम करताना गावातील तसेच पंचक्रोशीतील नागरिकांच्या अडचणीच्या काळात ते मदतीसाठी तत्परतेने धावून जात असत. कोणत्याही कुटुंबावर संकट आले किंवा सामाजिक उपक्रमासाठी मदतीची गरज भासली, तर ते सक्रियपणे सहभागी होत असत. पदापेक्षा माणुसकीला महत्त्व देणारा आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारा व्यक्ती म्हणून त्यांची परिसरात ओळख होती.

काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पुढाकारातून कडवई येथे शिवसेना शाखेचा शुभारंभ करण्यात आला होता. पक्षीय कार्यासोबतच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी काम करण्याचा तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला होता. त्यांच्या जनसंपर्काची आणि सामाजिक कार्याची पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनीही दखल घेतली होती.

वसंत उजगावकर यांच्या अचानक निधनाने कडवई परिसरातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या मनमिळावू स्वभावाची, मदतीसाठी सदैव पुढे येण्याची वृत्ती आणि सामाजिक बांधिलकीची आठवण ग्रामस्थांच्या मनात कायम राहणार आहे. त्यांच्या निधनाने ‘आपला माणूस’ हरपल्याची भावना व्यक्त करत ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा,राज ठाकरेंची मागणी

Gramin Varta
4 Min Read

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी २.० पोर्टल तातडीने सुरू करा

Gramin Varta
2 Min Read

कनकाडीतील ‘जल जीवन’ योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात संगमेश्वर पंचायत समितीसमोर ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू

Gramin Varta
2 Min Read

लांजा : पिकअपमधून बैलांची क्रूर वाहतूक;  पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात मतदार जनजागृती रॅली व स्वच्छता अभियान

1 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर : बुरंबाड-सरंद येथे भरधाव मोटारसायकल घसरून तरुणाचा मृत्यू

1 Min Read
संगमेश्वर

पाच वर्षांची हमी मग रस्ता दरवर्षी खड्ड्यात का? संगमेश्वर-साखरपा रस्त्याच्या दुरवस्थेबाबत गाव विकास समितीचा संतप्त सवाल

1 Min Read
संगमेश्वर

देवरुख-संगमेश्वर-साखरपा रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आमदार का बोलत नाहीत? गाव विकास समितीचे जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांचा सवाल

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?