ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: तुरळ अपघात प्रकरणी मृत चालकावर गुन्हा दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » तुरळ अपघात प्रकरणी मृत चालकावर गुन्हा दाखल
संगमेश्वर

तुरळ अपघात प्रकरणी मृत चालकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
Last updated: October 12, 2026 11:09 am
Gramin Varta
272 Views
Share

संगमेश्वर (प्रतिनिधी): मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील तुरळ गावच्या हद्दीत रविवारी सकाळी दुचाकीचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील दुचाकी रस्त्यालगतच्या लोखंडी संरक्षक कठड्यावर आदळल्याने चालक अनिकेत नारायण लाड (वय ३०, रा. पाचल, ता. राजापूर) याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेला त्याचा मित्र सुचित शांताराम गुरव (वय ३१, रा. वसई, जि. पालघर) हा रस्त्यावर फेकला जाऊन जखमी झाला. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर तालुक्यातील पाचल येथील रहिवासी असलेला अनिकेत लाड हा आपली यामाहा कंपनीची दुचाकी (क्रमांक एम.एच. ०३ ई.ई. ८३५६) चालवून वसई येथून मित्र सुचित गुरव याच्यासह आपल्या गावाकडे निघाला होता. रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी सात ते सव्वासात वाजण्याच्या सुमारास ही दुचाकी संगमेश्वर तालुक्यातील तुरळ गावच्या हद्दीत पोहोचली असता अनिकेतचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अतिवेगात व बेदरकारपणे गाडी चालविल्यामुळे दुचाकी रस्त्यालगत असलेल्या लोखंडी संरक्षक पत्र्यावर जोरदार आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, आदळल्यानंतर दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या धडकेत चालक अनिकेत लाड याच्या शरीराला गंभीर अंतर्गत मुक्कामार लागून तो जागीच ठार झाला, तर सुचित गुरव हा जखमी झाला.

या अपघातानंतर सुचित शांताराम गुरव याने संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मयत चालक अनिकेत नारायण लाड याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १०६ (१), १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक १३५/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत. सणासुदीच्या काळात गावी परतत असताना ऐन उंबरठ्यावर तरुणाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने पाचल परिसरावर शोककळा पसरली आहे.

Total Visitors :

5468469
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

एसआयआरची सर्वोच्च न्यायालयात दिवाळीनंतर पुढील सुनावणी

Gramin Varta
3 Min Read

राजापूर : भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला समोरासमोर धडक; स्कुटीस्वार तरुण गंभीर जखमी

Gramin Varta
2 Min Read

बौद्ध अनुयायांनी धम्मरत्न गतिमान ठेवण्याची गरज : बौद्धाचार्य प्रशांत जाधव

Gramin Varta
3 Min Read

माध्यमिक विद्यालय दाभोळेच्या मुख्याध्यापिका चित्रा कांबळे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

संगमेश्वर-देवरुख मार्गावर लोवले येथे भीषण आग; ३१ लाख ३५ हजारांचे भंगार व आयशर ट्रक जळून खाक

2 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर : कळंबस्ते येथे दुचाकी-कारची समोरासमोर जोरदार धडक

2 Min Read
संगमेश्वर

पुर्ये गावात अवघ्या दोनच दिवसात बंधारा वाहून गेला; निकृष्ट दर्जा आणि चुकीच्या नियोजनावर ग्रामस्थांचा तीव्र आक्षेप

2 Min Read
संगमेश्वर

आरवलीत दुचाकीला भरधाव कारची जोरदार धडक; चालक फरार, कार सीसीटीव्हीत कैद

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?