ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे सामवेद स्वाहाकार सोहळा भक्तिभावात संपन्न; भाविकांच्या उपस्थितीत पूर्णाहूती
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे सामवेद स्वाहाकार सोहळा भक्तिभावात संपन्न; भाविकांच्या उपस्थितीत पूर्णाहूती
रत्नागिरी

श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे सामवेद स्वाहाकार सोहळा भक्तिभावात संपन्न; भाविकांच्या उपस्थितीत पूर्णाहूती

Gramin Varta
Last updated: October 31, 2026 11:28 am
Gramin Varta
61 Views
Share

गणपतीपुळे/ वैभव पवार: प्रसिद्ध तीर्थक्षेत्र संस्थान श्रीदेव गणपतीपुळे येथील लंबोदर गणपती मंदिर परिसरात आयोजित पाच दिवसीय ‘सामवेद स्वाहाकार’ आणि पूर्णाहूती सोहळा समस्त ब्रह्मवृंद यांच्या उत्तम नियोजनात अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. बुधवार, २१ ऑक्टोबर ते रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ या आश्विन शुद्ध एकादशी ते चतुर्दशी या कालावधीत संपन्न झालेल्या या धार्मिक अनुष्ठानाला संस्थान श्रीदेव गणपतीपुळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हिंदू धर्मातील चार प्रमुख वेदांपैकी उपासना, मनाची शांती, संगीत आणि मंत्रगायनाशी निगडित असलेल्या सामवेदाच्या प्रचलित तीन शाखांपैकी राणायनीय संहिता शाखेचा स्वाहाकार येथे पूर्णत्वास नेण्यात आला. यापूर्वी ऋग्वेद आणि यजुर्वेद स्वाहाकार यशस्वीरीत्या संपन्न झाल्यानंतर आयोजित या ज्ञान, मंत्र आणि भक्तीच्या सोहळ्यात मुख्य आचार्य वेदमूर्ती तुकाराम मुळे गुरुजी (अहिल्यानगर) यांच्या मार्गदर्शनाखाली वे.मू. दत्तदास शेवडे गुरुजी (लांजा), वेदवित् मुळे, सचिन व्यास, जयप्रकाश शर्मा आणि अभिषेक शर्मा यांनी पौरोहित्य करत मंत्रजागर केला. या सोहळ्यात ब्रह्मवृंदांचे यजमान प्रतिनिधी म्हणून सौ. सुहिता आणि डॉ. चैतन्य वासंती वामन घनवटकर या दांपत्याने संकल्प पूर्ती केली. भारत देश, सनातन धर्म, भारतीय सैनिक आणि सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. लयबद्ध मंत्रघोष आणि स्वाहाकाराने अवघा मंदिर परिसर पावन झाला असून, मोठ्या संख्येने भाविकांनी या पर्वाचा लाभ घेतला; तसेच आगामी काळातही सर्वांच्या सहकार्याने असेच उपक्रम निरंतर होत राहोत, अशी कृतज्ञता आयोजक ब्रह्मवृंद, देवस्थान व भाविकांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

Total Visitors :

5469136
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राज्यातील शाळांमध्ये २८ हजारांहून अधिक शिक्षकेतर पदे भरण्यास मंजुरी; नवीन नियम जाहीर

Gramin Varta
2 Min Read

झाडांचे बारसे हा उपक्रम दिशादर्शक व अनुकरणीय : प्रा. डॉ. प्रदीप ढवळ

Gramin Varta
3 Min Read

मालगुंडच्या केशवसुत स्मारकात आधुनिक मराठी कवितेच्या जनकाला विनम्र अभिवादन; साहित्याचा रंगला जागर

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरीत सव्वा लाखांच्या ‘हायड्रोपोनिक गांजा’सह तिघांना अटक; वाहनांसह ४ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

नवरात्रोत्सवात नऊ दिवस मद्यपान-मांसाहाराला पूर्णविराम! भंडारपुळे-विरापुळेत २९ वर्षांची परंपरा कायम 

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीच्या आयटीआयचे देशपातळीवर झळाळते यश; अथर्व नागवेकर आणि श्रावणी चव्हाण देशात प्रथम

1 Min Read
रत्नागिरी

पोयनार लघुपाटबंधारे प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न; १४ गावांचा २५ वर्षांचा पाण्याचा प्रश्न मिटणार

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्व १६ प्रभागांतील सफाई कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?