ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: २०३७ पर्यंत एसटीचा ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट; २०२७ पासून जुन्या बसेसचे होणार ई-बसमध्ये रूपांतर : मंत्री प्रताप सरनाईक
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » २०३७ पर्यंत एसटीचा ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट; २०२७ पासून जुन्या बसेसचे होणार ई-बसमध्ये रूपांतर : मंत्री प्रताप सरनाईक
महाराष्ट्र

२०३७ पर्यंत एसटीचा ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट; २०२७ पासून जुन्या बसेसचे होणार ई-बसमध्ये रूपांतर : मंत्री प्रताप सरनाईक

Gramin Varta
Last updated: September 29, 2026 8:35 am
Gramin Varta
39 Views
Share

मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचा (एसटी) संपूर्ण ताफा २०३७ पर्यंत १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प शासनाने सोडला आहे. सद्यस्थितीत एसटीच्या ताफ्यात दाखल होत असलेल्या सुमारे ५ हजार डिझेल बसेस या अखेरच्या डिझेल बसेस ठरणार असून, यापुढे केवळ पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेसचाच समावेश केला जाणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटी मुख्यालयात नुकत्याच पार पडलेल्या ३१२ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी संचालक मंडळाचे सर्व सदस्य आणि महामंडळाचे विविध खातेप्रमुख उपस्थित होते.

सध्या एसटीच्या ताफ्यात जवळपास १४ हजार बसेस कार्यरत असून त्यापैकी केवळ १ हजार १०० बसेस इलेक्ट्रिक स्वरूपातील आहेत. नियमानुसार वयोमर्यादा संपलेल्या ताफ्यातील सुमारे ५ हजार जुन्या डिझेल बसेस टप्प्याटप्प्याने मोडीत (स्क्रॅप) काढल्या जाणार आहेत. याशिवाय, सात ते आठ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या चांगल्या स्थितीतील जुन्या डिझेल बसेसचे २०२७ पासून थेट इलेक्ट्रिक बसेसमध्ये रूपांतर करण्याची विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. सामान्यतः डिझेल बसेसचे आयुर्मान सुमारे १५ वर्षे असते, तर ई-बसेसचे आयुष्य २० वर्षे असल्याने महामंडळाला या वाहनांचा प्रदीर्घ काळ लाभ घेता येईल. या निर्णयामुळे महामंडळाचे डिझेलवरील परावलंबित्व संपुष्टात येऊन इंधन खर्चात कोट्यवधी रुपयांची बचत साध्य होणार आहे.

विद्युत बसेसच्या वाढत्या संख्येचा विचार करून आवश्यक चार्जिंग स्टेशन्स, वीज पुरवठा आणि पूरक तांत्रिक पायाभूत सुविधांची उभारणी समांतरपणे वेगाने सुरू करण्यात आली आहे. डेपोनिहाय नियोजन आखून बसेसची खरेदी आणि चार्जिंग यंत्रणेची निर्मिती एकाच वेळी पूर्ण केली जाईल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी पारंपरिक लालपरी भविष्यात हरित महाराष्ट्राची ‘ई-लालपरी’ म्हणून ओळखली जाईल, असा विश्वास व्यक्त करतानाच, देशातील सर्वात आधुनिक आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचे आदर्श मॉडेल म्हणून एसटीची नवी ओळख निर्माण करण्यासाठी ही नियोजनबद्ध पावले उचलली जात असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

डॉक्टर मारहाण प्रकरण; नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द, ३ दिवसांत शरण येण्याचे आदेश

Gramin Varta
2 Min Read

राज्यातील एसटी बसस्थानकांवर स्तनदा माता व बाळांच्या सुरक्षिततेसाठी उभारणार १२५ ‘हिरकणी कक्ष’

Gramin Varta
2 Min Read

मुंबईत मनोरी किनाऱ्यावर अडकलेल्या संशयास्पद जहाजात चार जणांचा गुदमरून गूढ मृत्यू

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी: बाथरूममध्ये पाय घसरून पडलेल्या नाचणे येथील ८० वर्षीय वृद्धाचा उपचारापूर्वी मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोलवसुलीविरोधात जनआक्रोश समितीची उच्च न्यायालयात धाव; जनहित याचिका करणार दाखल 

2 Min Read
महाराष्ट्र

राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबवणार

2 Min Read
महाराष्ट्र

करदात्यांना केंद्राचा मोठा दिलासा; ITR File भरण्याची मुदत वाढवली

1 Min Read
महाराष्ट्र

एफडीएचा मुंबईत धडाका; काळबादेवीतील १०० वर्षे जुन्या ‘क्यानी अँड कंपनी’सह नामांकित आस्थापनांचे परवाने निलंबित

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?