ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ‘खेडच्या राजा’च्या विसर्जन मिरवणुकीत वैभव खेडेकरांचा जल्लोष; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला भावपूर्ण निरोप
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Sunday, Oct 4, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ‘खेडच्या राजा’च्या विसर्जन मिरवणुकीत वैभव खेडेकरांचा जल्लोष; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला भावपूर्ण निरोप
खेड

‘खेडच्या राजा’च्या विसर्जन मिरवणुकीत वैभव खेडेकरांचा जल्लोष; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला भावपूर्ण निरोप

Gramin Varta
Last updated: September 26, 2026 8:24 pm
Gramin Varta
256 Views
Share

खेड : अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने खेड शहरातील मानाचा ‘खेडचा राजा’ गणरायाची भव्य विसर्जन मिरवणूक पारंपरिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा ताल आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने संपूर्ण खेड शहर दुमदुमून गेले होते. मोठ्या संख्येने गणेशभक्त या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

शहरातून निघालेल्या या विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांनी पारंपरिक पद्धतीने नृत्य करत आणि ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरत बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. विशेष म्हणजे, मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध मान्यवरांनीही ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरत गणेशोत्सवाचा उत्साह अनुभवला. त्यामुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली होती.

मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत खेड शहरातील जगबुडी नदीकिनारी पोहोचली. तेथे विधिवत पूजा-अर्चा करून आणि भक्तिभावाने ‘खेडच्या राजा’चे जगबुडी नदीच्या पात्रात विसर्जन करण्यात आले. यावेळी गणेशभक्तांनी मोठ्या भावनेने बाप्पाला निरोप देत पुढील वर्षी पुन्हा लवकर येण्याची प्रार्थना केली.

या विसर्जन मिरवणुकीत भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, नगरसेविका स्वप्नाली चव्हाण, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, माजी नगराध्यक्ष उर्मिला ताई शेट्ये-पाटणे, माजी नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्षा आशा सनगरे, भाजपा खेड शहर उपाध्यक्ष राहुल पाटणे, भाजपा प्रेरित रिक्षा सेल खेड तालुकाध्यक्ष राजन खेडेकर, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा महिला मोर्चा खेड शहर उपाध्यक्ष प्रीती चिखले, भाजपा रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी सदस्य निलेश बामणे, भाजपा खेड शहर चिटणीस राकेश चव्हाण, भाजपा खेड उपशहराध्यक्ष प्रणव मापुस्कर, भाजपा खेड शहर चिटणीस अनिकेत पवार, भाजपा खेड शहर शक्तीकेंद्र प्रमुख वैजेश सागवेकर, भाजपा सोशल मीडिया संयोजक अंकुश मिर्लेकर, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, अक्षय सनगरे, तुषार पवार, बाळू वर्मा, प्रदीप भोसले, रोहित भुवड यांच्यासह विविध मान्यवर आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘खेडचा राजा’च्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरात निर्माण झालेल्या उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणामुळे यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात पार पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. ढोल-ताशांचा निनाद, गणेशभक्तांचा उत्साह आणि बाप्पाच्या जयघोषात खेडकरांनी आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.

Total Visitors :

5435556
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

ब्रेकिंग : राजापूरातील अजिवली येथे महावितरणच्या तुटलेल्या तारेचा शॉक लागून गुराख्याचा दुर्दैवी मृत्यू

Gramin Varta
3 Min Read

‘अनुष्का… थांब!’ मैत्रिणींचा आक्रोश हवेतच विरला; कानात इअरबड्स घालून रुळावरून चालणाऱ्या विद्यार्थिनीला एक्स्प्रेसची जोरदार धडक

Gramin Varta
2 Min Read

रिचार्जमध्ये ‘डेटा’चा भार कमी होणार आता फक्त कॉलिंगसाठी स्वतंत्र रिचार्ज

Gramin Varta
2 Min Read

बॉक्स ऑफिसवर सिद्धार्थ-तमन्नाच्या ‘द वन’चा जलवा

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

खेडमध्ये बांधकाम साइटवरून पडून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

1 Min Read
खेड

खेडमध्ये बांधकाम साइटवरून पडून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

1 Min Read
खेड

खेड : नदीकाठी फेरफटका मारताना मधमाशांच्या हल्ल्यात की वृद्धाचा मृत्यू

1 Min Read
खेड

खेड: भेलसई पुलावर मोटारसायकल कठड्यावर आदळली; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?