ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: खेड : ‘विकास देशाचा, कोकणचा आणि माझ्या गावचा!’ आमदार प्रमोद जठार यांचा कार्यकर्त्यांना मूलमंत्र
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » खेड : ‘विकास देशाचा, कोकणचा आणि माझ्या गावचा!’ आमदार प्रमोद जठार यांचा कार्यकर्त्यांना मूलमंत्र
खेड

खेड : ‘विकास देशाचा, कोकणचा आणि माझ्या गावचा!’ आमदार प्रमोद जठार यांचा कार्यकर्त्यांना मूलमंत्र

Gramin Varta
Last updated: October 7, 2026 4:15 pm
Gramin Varta
19 Views
Share

खेड : ‘२५ वर्षे जनसेवेतून राष्ट्रसेवा’ या व्यापक संकल्पनेतून आयोजित ‘विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा’ कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष संबोधनाचे थेट प्रक्षेपण खेड येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत पाहिले. या सोहळ्यात मार्गदर्शन करताना आमदार प्रमोद जठार यांनी “विकास देशाचा, विकास कोकणचा आणि विकास माझ्या गावचा” असा प्रभावी मूलमंत्र देत प्रत्येक कार्यकर्त्याला गावपातळीवरील विकासाचा ठोस आराखडा तयार करून तो प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात कार्यकर्त्यांना दिशा देताना आमदार जठार म्हणाले की, देशातील शेवटच्या सामान्य नागरिकाचा सर्वांगीण विकास होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने २०४७ पर्यंतच्या ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार होणार आहे. यासाठी प्रत्येक गावातील भाजप कार्यकर्त्याचे घर हे सर्वसामान्यांसाठी हक्काचे कार्यालय बनले पाहिजे, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांनी ‘गाव चलो’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक वाडी-वस्तीवर पोहोचून ग्रामस्थांच्या समस्या समजून घ्याव्यात व गावाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करावा, असे स्पष्ट केले. केवळ संघटनात्मक कामकाजापुरते मर्यादित न राहता गावोगावच्या मूलभूत सोयी-सुविधा, विकासकामे आणि लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

या सोहळ्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. यासोबतच पक्षाच्या संघटनात्मक रचनेला बळकटी देण्यासाठी कार्यकर्त्यांना विविध जबाबदाऱ्यांचे नियुक्तीपत्रही प्रदान करण्यात आले.

या भव्य सभेला भाजप नेते तथा खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा महामंत्री तथा गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे, खेड पंचायत समितीचे माजी सभापती विजयराव कदम, युवा मोर्चा प्रदेश सचिव ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, कोकण पदवीधर प्रकोष्ठ कोअर कमिटी सहसंयोजक अजय दळवी, जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, उत्तर खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, दक्षिण खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके, खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, नगरसेविका वैभवी खेडेकर, दापोली नगरपंचायतीच्या नगरसेविका जया साळवी, माजी नगराध्यक्षा उर्मिला शेट्ये-पाटणे, माजी नगरसेविका आशा सनगरे, शहर चिटणीस ममता दांडेकर, संजीवनी शेलार, आर्या कारेकर, ट्रान्सपोर्ट सेलचे उपजिल्हाध्यक्ष निलेश बामणे, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश भुवड, सुयश खेडेकर, तुषार पवार, अजय तोडकरी, विनायक शिरगावकर, वैजेश सागवेकर, धीरज पटेल, शुभम गायकवाड, विशाल होळकर, अविराज मोरे, स्वराज गांधी, दत्तात्रय मोरे, विजय गुप्ता, अनिकेत पवार, सर्वेश पवार, बाळू वर्मा, राहुल प्रभू, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले यांच्यासह तालुक्यातील विविध आघाड्यांचे प्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख, बूथ अध्यक्ष आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitors :

5469776
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

कळझोंडी उपकेंद्रात सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ६२ ग्रामस्थांनी घेतला लाभ

Gramin Varta
2 Min Read

महामार्गांवर ‘गोल्डन अवर’मध्ये जखमींना जीवनदान देण्यासाठी परिवहन विभागाचा पुढाकार; अपघातप्रवण पट्ट्यांत १०० नव्या रुग्णवाहिका तैनात होणार

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत पावसाळा संपण्यापूर्वीच उन्हाचा कडाका; ऐन सप्टेंबरमध्ये ‘ऑक्टोबर हीट’चे चटके

Gramin Varta
2 Min Read

चिपळूणच्या ग्रॅव्हिटी पाणी योजनेला अखेर गती; मे २०२७ पर्यंत शहरवासीयांना दिलासा मिळण्याची शक्यता

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

खेड

खेड: तीन लाखांच्या नोटांचे बंडल ठेवून सराफाला दोन लाखांचा गंडा; लोटेतील सोन्याच्या दुकानात भरदिवसा फसवणूक

2 Min Read
खेड

खेड नगरपरिषदेच्या वतीने ‘सावित्रीबाई शहर वस्तीस्तर महिला बचत गट’ वस्तू प्रदर्शन व विक्री महोत्सवाचा शानदार शुभारंभ

2 Min Read
खेड

खेडमध्ये भाजप व राजवैभव प्रतिष्ठानतर्फे श्री अंबाभवानी नवरात्रोत्सवास प्रारंभ; ‘नमो दांडिया’ सह भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

2 Min Read
खेड

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी अ‍ॅड. मिलिंद उर्फ दादू नांदगावकर; खेडच्या सुपुत्राला प्रदेश कार्यकारिणीत मानाचे स्थान

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?