ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: खेडमध्ये भाजप व राजवैभव प्रतिष्ठानतर्फे श्री अंबाभवानी नवरात्रोत्सवास प्रारंभ; ‘नमो दांडिया’ सह भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » खेडमध्ये भाजप व राजवैभव प्रतिष्ठानतर्फे श्री अंबाभवानी नवरात्रोत्सवास प्रारंभ; ‘नमो दांडिया’ सह भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
खेड

खेडमध्ये भाजप व राजवैभव प्रतिष्ठानतर्फे श्री अंबाभवानी नवरात्रोत्सवास प्रारंभ; ‘नमो दांडिया’ सह भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Gramin Varta
Last updated: October 13, 2026 5:56 pm
Gramin Varta
107 Views
Share

खेड: भारतीय जनता पार्टी खेड आणि राजवैभव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ११ ते २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत श्री अंबाभवानी सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. गेल्या १९ वर्षांची गौरवशाली परंपरा जपत खेडवासीयांच्या सहकार्याने हा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा होत असून, यंदा दररोज रात्री रंगणाऱ्या ‘नमो दांडिया’ स्पर्धेमुळे शहरात तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचणार असल्याची माहिती भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी दिली.

घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात देवीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना, राजोपचार पूजा, नित्य महाआरती, देवीचा गोंधळ जागर, श्री सप्तशती पाठवाचन, विविध धार्मिक अभिषेक, कुमारिका पूजन तसेच नवचंडी हवनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या ‘नमो दांडिया’ स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कलाकारांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून, विजयादशमीच्या दिवशी अंतिम तीन विजेत्यांची निवड केली जाणार आहे. यामुळे पारंपरिक भक्तिभावासोबतच दांडियाच्या तालावर थिरकण्याची उत्तम संधी खेडकरांना उपलब्ध झाली आहे.

उत्सवाच्या सांगता टप्प्यात २० ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर भव्य दीपोत्सव आणि महाआरती संपन्न होणार आहे, तर २१ ऑक्टोबर रोजी उत्तरपूजा व श्री अंबाभवानी मातेच्या विसर्जन मिरवणुकीने या सोहळ्याची सांगता होईल. धार्मिक पावित्र्य, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि दांडियाचा जल्लोष अशा चैतन्यमय वातावरणात रंगणाऱ्या या नवरात्रोत्सवात सर्व नागरिकांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आग्रही आवाहन ॲड. वैभव खेडेकर यांनी केले आहे.

Total Visitors :

5468707
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

कर्तव्यावर प्राणाची बाजी लावणाऱ्या पोलिसांना मिळणार ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’

Gramin Varta
2 Min Read

दापोलीतील फेरीवाल्यांवरील कारवाई सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरच; भाजपचा जोरदार निशाणा

Gramin Varta
2 Min Read

प्रदीप पूर्णेकर हत्याकांड प्रकरणी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या पतीची सलग आठ तास कसून चौकशी; एसआयटी ॲक्शन मोडवर

Gramin Varta
2 Min Read

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत तळवडेच्या पेडणेकर विद्यालयाचा दबदबा कायम; मुला-मुलींच्या संघांची विजेतेपदाला गवसणी

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

खेड

मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात भीषण अपघात; केमिकल टँकर २५० फूट दरीत कोसळला, चालक सुखरूप बचावला

2 Min Read
खेड

5 Ways to Manage Your spending on Multiple Credit Cards

7 Min Read
खेड

खेड : ‘विकास देशाचा, कोकणचा आणि माझ्या गावचा!’ आमदार प्रमोद जठार यांचा कार्यकर्त्यांना मूलमंत्र

3 Min Read
खेड

खेडमध्ये जगबुडी नदीपात्रात ८० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला; बेपत्ता झाल्यानंतर तीन दिवसांनी लागला शोध

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?