ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: खेड: तीन लाखांच्या नोटांचे बंडल ठेवून सराफाला दोन लाखांचा गंडा; लोटेतील सोन्याच्या दुकानात भरदिवसा फसवणूक
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » खेड: तीन लाखांच्या नोटांचे बंडल ठेवून सराफाला दोन लाखांचा गंडा; लोटेतील सोन्याच्या दुकानात भरदिवसा फसवणूक
खेड

खेड: तीन लाखांच्या नोटांचे बंडल ठेवून सराफाला दोन लाखांचा गंडा; लोटेतील सोन्याच्या दुकानात भरदिवसा फसवणूक

Gramin Varta
Last updated: November 10, 2026 8:15 am
Gramin Varta
105 Views
Share

खेड : बनावट नोटांच्या आधारे विश्वास संपादन करून सराफी दुकानातून लाखो रुपयांचे दागिने घेऊन पसार होण्याचा प्रकार मुंबई-गोवा महामार्गालगत लोटे-घाणेखूंट येथे घडला आहे. सोमवारी दुपारी सुमारे पावणेएकच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी सोनल ज्वेलर्स या दुकानात खरेदीदार असल्याचे भासवून दुकानदाराची तब्बल दोन लाख रुपयांची फसवणूक केली. तीन लाख रुपये असल्याचे भासवणारी पाचशे रुपयांच्या नोटांची सहा बंडले दुकानाच्या काउंटरवर ठेवून आरोपींनी दोन सोन्याच्या चेन हातोहात लंपास केल्या.

सोनगाव-माठवाडी (ता. खेड) येथील संतोष आदावडे यांच्या मालकीचे हे दुकान असून, घटनेच्या वेळी ते आणि त्यांचा भाचा दुकानात उपस्थित होते. याचदरम्यान दोन अनोळखी तरुण ग्राहक म्हणून दुकानात आले. त्यांनी सोन्याच्या चेन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आदावडे यांनी त्यांना विविध चेन दाखवल्या. त्यापैकी एक चेन मित्राला दाखवून येण्याच्या बहाण्याने एक तरुण दुकानाबाहेर गेला आणि काही वेळाने दुसऱ्या साथीदारासह परतला.

त्यानंतर दोघांनी दोन चेन खरेदी करण्याचे निश्चित केल्याचा आव आणत आपल्याकडील कॅरीबॅगमधून पाचशे रुपयांची सहा बंडले काढून काउंटरवर ठेवली. ही रक्कम तीन लाख रुपये असल्याचे सांगत, पैसे दुकानातच ठेवण्यास सांगून चेन मित्रांना दाखवून येतो, असे त्यांनी दुकानदाराला भासवले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दुकानातून बाहेर जाण्यास संमती मिळताच दोघांनी दागिने सोबत घेतले आणि तेथून काढता पाय घेतला.

दरम्यान, दुकानाबाहेर उभ्या असलेल्या आदावडे यांच्या भाच्याला संशय आल्याने त्याने दोघांवर लक्ष ठेवले. मात्र, महामार्गावर आधीच उभ्या असलेल्या नंबरप्लेट नसलेल्या चारचाकी वाहनात बसून आरोपींनी मुंबईच्या दिशेने वेगाने पलायन केले. वाहनाचा क्रमांक उपलब्ध नसल्याने त्यांचा पाठलाग करूनही ठोस माहिती मिळवणे शक्य झाले नाही. यानंतर काउंटरवरील बॅग तपासली असता त्यातील नोटा बनावट असल्याचे उघड झाले. आपल्याला नियोजनबद्ध पद्धतीने गंडा घातल्याचे लक्षात येताच दुकानदाराला धक्का बसला.

घटनेची माहिती मिळताच लोटे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मात्र, दुकानात स्वतःचे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे दुकान असलेल्या कॉम्प्लेक्समधील सीसीटीव्ही यंत्रणेतही मेमरी कार्ड नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोपींच्या हालचालींचे चित्रण मिळवण्याचा मार्गही सध्या अडचणीचा ठरत आहे.

महामार्गालगतच्या गजबजलेल्या परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बनावट चलनी नोटांचा वापर करून सराफाची फसवणूक करणाऱ्या या दोघांचा शोध घेण्यासाठी लोटे पोलीस पुढील तपास करत आहेत.

Total Visitors :

5469327
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

युवा क्रांती सेनेच्या निवेदनाची महसूल मंत्र्यांकडून दखल; जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीचे निर्देश

Gramin Varta
3 Min Read

खेड शहरात मोकाट श्वानांचा वाढता उच्छाद; निर्बीजीकरण मोहीम कागदावरच असल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात

Gramin Varta
2 Min Read

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तातही चिपळूण पोलिसांची कर्तव्यतत्परता; रिक्षाचालकाचा हरवलेला मोबाईल शोधून केला सुपूर्द

Gramin Varta
2 Min Read

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारण अभियानांतर्गत बिजघर नं. १ शाळेने बांधला वनराई बंधारा

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

खेडमध्ये बांधकाम साइटवरून पडून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

1 Min Read
खेड

खेड: कळंबणी बुद्रुक येथे बंद घराची खिडकी फोडून घरफोडी; टीव्हीसह स्वयंपाकाची भांडी पळवली

1 Min Read
खेड

खेड तालुकास्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धेत बिजघर शाळा क्रमांक १ चे घवघवीत यश; शुभ्रा जंगम, शौर्य मर्चंडे यांची बाजी

1 Min Read
खेड

खेड : हॉटेलमध्ये घुसून तरुणाला मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?