ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: युवा क्रांती सेनेच्या निवेदनाची महसूल मंत्र्यांकडून दखल; जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीचे निर्देश
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » युवा क्रांती सेनेच्या निवेदनाची महसूल मंत्र्यांकडून दखल; जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीचे निर्देश
रत्नागिरी

युवा क्रांती सेनेच्या निवेदनाची महसूल मंत्र्यांकडून दखल; जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीचे निर्देश

Gramin Varta
Last updated: November 3, 2026 8:14 am
Gramin Varta
59 Views
Share

शालेय अन्नात चायनीज भेळ; अन्नघोटाळ्याप्रकरणी तुकाराम मुंडे यांच्याकडे पाठपुरावा

रत्नागिरी: महसूल विभागाशी संबंधित जनतेच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत युवा क्रांती सेनेच्या वतीने राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता, त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील प्रश्नांवर सविस्तर निवेदन सादर करण्यात आले होते. या निवेदनाची महसूल मंत्र्यांनी अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून, त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे सकारात्मक उत्तर प्रशासनाकडून प्राप्त झाले आहे. महसूल मंत्र्यांनी यासंदर्भात रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ आवश्यक ती पावले उचलून सर्व प्रलंबित विषय मार्गी लावण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या अधिकृत पत्राची प्रत युवा क्रांती सेनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत प्रसिद्धी माध्यमांना दाखवण्यात आली. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन शिंदे यांनी महसूल विभागाशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर माहिती दिली.

या निवेदनामध्ये प्रामुख्याने रेशन दुकान, भूमी अभिलेख विभाग, कंत्राटी कामगार आणि रेशन कार्ड संदर्भातील अडचणींवर भर देण्यात आला होता. रेशन कार्डवर नमूद करण्यात येणाऱ्या वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेबाबत बोलताना, सध्या शहरी भागाकरिता ६० हजार रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आल्याचे सांगत या व इतर मागण्यांवर शासन स्तरावरून सकारात्मक पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

दुसऱ्या बाजूला रत्नागिरीमध्ये अन्नघोटाळ्याचा प्रश्न अतिशय गंभीर स्वरूपाचा बनला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार सुरू असून, त्यांनी यावर योग्य तो पाठपुरावा केला आहे. शालेय पाल्यांना शाळांमध्ये जे खाद्यान्न दिले जाते, त्यात चायनीज भेळसारखे अयोग्य आणि निकृष्ट अन्न दिले जात असल्याचे पुराव्यानिशी उघड झाले आहे. मात्र, सर्व पुराव्यांसह संबंधित यंत्रणेला माहिती दिल्यानंतर तातडीने धाड टाकून कारवाई होणे गरजेचे असताना, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार किंवा फोनवरून कारवाईचे निर्देश मिळण्यापूर्वीच ती संशयास्पद ठिकाणे बंद केली जातात, ही अत्यंत दुर्दैवाची बाब असल्याचे पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आले. या गंभीर गैरप्रकाराबाबत पुन्हा एकदा तुकाराम मुंडे यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून, लवकरच रत्नागिरीच्या अन्नविशोषक कार्यालयातून यावर अधिकृत पत्र आणि कारवाईची दिशा स्पष्ट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, फेरीवाले आणि हातावर पोट असणाऱ्या घटकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या नगर परिषदेच्या हॉकर्स झोनच्या कामाची सद्यस्थिती काय आहे, याचा स्पष्ट खुलासा प्रशासनाने सार्वजनिक सभा किंवा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. हॉकर्स झोन संदर्भात नेमकी काय कारवाई सुरू आहे, सर्वेक्षणाचे काम कुठपर्यंत आले आहे आणि गरजू लोकांना याचा लाभ कधी व कसा मिळणार, याबाबत स्पष्टता असणे गरजेचे असून प्रशासनाने दिलेली आश्वासने कधी पूर्ण होणार, याविषयीची वस्तुस्थिती जनतेसमोर आणली पाहिजे, असे यावेळी सांगण्यात आले. यासोबतच एमआयडीसी क्षेत्रातील वाढत्या प्रदूषणाचा मुद्दाही उपस्थित करत, यासंदर्भात प्रशासकीय स्तरावर आणि पंकजा मुंडे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला असून प्रदूषणाविरुद्ध लवकरात लवकर ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Total Visitors :

5468457
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

नाणार खाडी दुर्घटना : पाच दिवसांच्या अथक शोधकार्यानंतर बेपत्ता माहिराचा मृतदेह कांदळवनात सापडला; एकाच कुटुंबातील चार चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू

Gramin Varta
2 Min Read

मुर्डी येथे ‘सेवा माझे योगदान’ उपक्रमांतर्गत अंगणवाडी परिसर स्वच्छता; शासकीय योजनांचे प्रबोधन

Gramin Varta
1 Min Read

कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना: वाय. पी. पोवार नगरची २१ फुटी ‘बॅलेंसिंग’ गणेशमूर्ती कोसळली

Gramin Varta
2 Min Read

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाची दुरवस्था; तोडफोडीच्या चौकशीसह सीसीटीव्ही आणि संरक्षक कठड्याची वंचितची मागणी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी: भाटे दर्गा स्टॉपजवळ चालत्या कारला लागलेल्या आगीत सुमारे १ लाखांचे नुकसान

1 Min Read
रत्नागिरी

केस कापायला जातो म्हणून घरातून निघालेला रत्नागिरीतील तरुण महिनाभरापासून बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

1 Min Read
रत्नागिरी

रत्‍नागिरीतील तरुणाचा ओमानमध्ये विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू

1 Min Read
रत्नागिरी

‘स्कील इज फ्युचर’; तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनी कौशल्ये सातत्याने अपग्रेड करावीत: जिल्हाधिकारी मनुज जिंदल

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?