ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीत पावसाळा संपण्यापूर्वीच उन्हाचा कडाका; ऐन सप्टेंबरमध्ये ‘ऑक्टोबर हीट’चे चटके
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीत पावसाळा संपण्यापूर्वीच उन्हाचा कडाका; ऐन सप्टेंबरमध्ये ‘ऑक्टोबर हीट’चे चटके
रत्नागिरी

रत्नागिरीत पावसाळा संपण्यापूर्वीच उन्हाचा कडाका; ऐन सप्टेंबरमध्ये ‘ऑक्टोबर हीट’चे चटके

Gramin Varta
Last updated: September 22, 2026 8:22 am
Gramin Varta
41 Views
Share
hot temperature,Thermometer on yellow sky with sun shining in summer show higher Weather, concept global warming

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा हंगाम अधिकृतरीत्या संपण्याआधीच नागरिकांना तीव्र उकाड्याचा आणि कडक उन्हाचा सामना करावा लागत असून सप्टेंबर महिन्यामध्येच ‘ऑक्टोबर हीट’चे चटके बसू लागले आहेत. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात सातत्याने हजेरी लावणारा पाऊस यंदा सुरुवातीपासूनच गायब राहिल्याने संपूर्ण पावसाळा कोरडा गेला आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाची उपस्थिती अपेक्षित असताना, तिसऱ्या आठवड्यातच हलक्या सरी वगळता पावसाने पूर्णपणे दडी मारली आहे. याचा थेट परिणाम तापमानावर झाला असून कमाल तापमानासोबतच किमान तापमानातही २.५ ते ३ अंशांची वाढ नोंदवली गेली आहे. साधारणपणे या महिन्यात २९ ते ३० अंश सेल्सिअस असणारे कमाल तापमान यंदा थेट ३२ ते ३३ अंशांवर पोहोचले आहे, तर २३ ते २४ अंशांवर राहणारे किमान तापमान २६.५ अंशांपर्यंत वाढले आहे. यामुळे प्रत्यक्ष ऑक्टोबर महिन्यात उष्णतेची लाट अधिकच त्रासदायक ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

यंदाच्या पावसाने प्रारंभापासूनच लहरीपणा दाखवत असहकार पुकारल्याने जिल्ह्यात कुठेही सलग असा मुसळधार पाऊस झाला नाही. ऐन पावसाळ्याच्या दिवसांत ऊन-पावसाचा खेळ सुरू राहिल्याने हवेतील गारवा पूर्णपणे हरवला आणि उन्हाची तीव्रता वाढत गेली. गतवर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धात झालेल्या पावसाने दिलासा दिला होता आणि ऑगस्टपासून पुढे १४ ऑक्टोबरपर्यंत पावसाने सातत्य राखल्याने सरासरीच्या ९० टक्के पाऊस पडून पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली होती. मात्र यंदा परिस्थिती पूर्णपणे उलट असून पावसाच्या मोठ्या खंडामुळे शेती करपण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी सुरुवातीच्या पावसाळ्यातच पाच ते सहा वेळा दुथडी भरून वाहणाऱ्या जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पात्रे यंदा केवळ जगबुडी नदीचा अपवाद वगळता नियंत्रणातच राहिली. आता सप्टेंबरमध्येच कडक ऊन पडू लागल्याने नद्या आणि धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होऊ लागली असून, येत्या काळात तीव्र पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत आहे.

Total Visitors :

5427550
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

Beyond Numbers, Exploring the Intricate Patterns of the Universe

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

Bluetooth Technology Work in Tandem for Indoor Positioning System

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

गणपती सजावटीदरम्यान विजेचा धक्का; संगमेश्वरातील ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

मुंबई ते मडगाव दरम्यान आणखी ४ विशेष गाड्या

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

मालगुंड ग्रामपंचायतीत जयगड पोलिसांचा सायबर जनजागृती उपक्रम; ‘मिशन प्रबोधन’ अंतर्गत नागरिकांशी थेट संवाद

2 Min Read
रत्नागिरी

चरवेली येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सावंत यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार प्रदान

2 Min Read
रत्नागिरी

Revolutionizing Entertainment Key Insights into the Digital Transformation Shift

7 Min Read
रत्नागिरी

निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा वर्तक कुटुंबीयांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव देखावा

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?