ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: जागतिक अन्न दिनानिमित्त शिरगावच्या मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये पाककला स्पर्धा संपन्न
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » जागतिक अन्न दिनानिमित्त शिरगावच्या मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये पाककला स्पर्धा संपन्न
रत्नागिरी

जागतिक अन्न दिनानिमित्त शिरगावच्या मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये पाककला स्पर्धा संपन्न

Gramin Varta
Last updated: October 17, 2026 5:16 pm
Gramin Varta
98 Views
Share

रत्नागिरी: जागतिक अन्न दिनाचे औचित्य साधून तसेच महाराष्ट्र शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे मत्स्य पदार्थ पाककला स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. ‘आजचा नवोन्मेष, उद्याचे सुदृढ पोषण’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित पार पडलेल्या या स्पर्धेला जिल्ह्यातील खवय्ये आणि गृहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र झाडगाव, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन आणि इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात १९ स्पर्धकांनी तब्बल ३३ विविध प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण मत्स्यपदार्थांचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. केतनकुमार चौधरी यांनी मत्स्य पदार्थांचे मानवी आहारातील पोषणमूल्य आणि स्वयंरोजगार निर्मितीतील अफाट वाव यावर प्रकाश टाकला. मत्स्य उत्पादनांवर प्रक्रिया करून तयार करण्यात येणाऱ्या मूल्यवर्धित उत्पादनांमुळे ग्रामीण व किनारी भागात नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात, तसेच समाजातील कुपोषण दूर करून निरोगी जीवनशैलीसाठी मत्स्याहार अत्यंत प्रभावी ठरतो, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्राध्यापक डॉ. आसिफ उमर पागारकर यांनी मानवी आरोग्यासाठी माशांचे अनन्यसाधारण महत्त्व विशद करून संतुलित आहारातील त्यांच्या भूमिकेवर सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. सुवर्णा चौधरी, रोटरी क्लब मिडटाउनचे अध्यक्ष डॉ. संदीप करे, सचिव सीताराम सावंत तसेच राजेंद्र कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

मत्स्य व सागरी खाद्यपदार्थांचे पौष्टिक महत्त्व जनमानसात रुजविणे आणि पाककलेतील नाविन्यतेला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेचे परीक्षण हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील तज्ज्ञ श्रीमती मेघना विनायक शेलार, गद्रे मरीनचे शेफ अनिकेत बडबे आणि डॉ. आसिफ पागारकर यांनी चव, दर्जा, पोषण आणि सादरीकरण या निकषांवर केले. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करत श्रीमती दीपिका दिनेश कुबल यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर श्रीमती विशाखा विवेक पिलणकर यांनी द्वितीय आणि श्रीमती मीनाक्षी आतिश कीर यांनी तृतीय क्रमांक संपादन केला. याशिवाय अनिरुद्ध शारंगंधर, वैदेही चव्हाण, जान्हवी साखरकर आणि वैष्णवी यादव यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विजेत्यांना अनुक्रमे तीन हजार, दोन हजार, एक हजार व उत्तेजनार्थ प्रत्येकी पाचशे रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या पारितोषिकांचे प्रायोजकत्व रोटरी क्लब मिडटाउनने भूषविले.

सदर उपक्रमासाठी कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजयकुमार तोरणे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे आणि सहयोगी अधिष्ठाता डॉ. वरवडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तंत्रनिकेतन व संशोधन केंद्रातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. मत्स्य उत्पादनांचे मूल्यवर्धन आणि त्यातून स्वावलंबनाचा मार्ग कसा सुकर होऊ शकतो, याचा उत्तम वस्तुपाठ या स्पर्धेच्या माध्यमातून समोर आला.

Total Visitors :

5469306
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव: गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या श्रीरंग जोगळेकरला संवादिनी वादनात सुवर्णपदक

Gramin Varta
1 Min Read

राजापूर : आडिवऱ्यात नवरात्रोत्सवानिमित्त राज्यस्तरीय सोलो व ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरीत मध्यरात्री भरधाव मोटारीचा थरार; थिबा पॅलेस मार्गावर वाहनासह बंगल्याच्या कंपाऊंडला जोरदार धडक

Gramin Varta
2 Min Read

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; शासनाकडुन ७५०० कोटींच्या मदतीची घोषणा

Gramin Varta
4 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

विभागीय सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेत वाटद खंडाळा विद्यालयाच्या मुलींचे घवघवीत यश; पटकावले उपविजेतेपद

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत आकाशप्रेमींनी अनुभवला अद्भुत खगोलीय सोहळा; चंद्रामागे लपला तेजस्वी शुक्र

1 Min Read
रत्नागिरी

मोकाट जनावरे, अंधारे रस्ते आणि पुसलेल्या साईड पट्ट्या; शहराच्या सुरक्षिततेसाठी वंचित बहुजन आघाडीचे नगर परिषदेला निवेदन

3 Min Read
रत्नागिरी

ब्रेकिंग:रत्नागिरी जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलमुळे पोलीस यंत्रणा सतर्क

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?