ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मोकाट जनावरे, अंधारे रस्ते आणि पुसलेल्या साईड पट्ट्या; शहराच्या सुरक्षिततेसाठी वंचित बहुजन आघाडीचे नगर परिषदेला निवेदन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मोकाट जनावरे, अंधारे रस्ते आणि पुसलेल्या साईड पट्ट्या; शहराच्या सुरक्षिततेसाठी वंचित बहुजन आघाडीचे नगर परिषदेला निवेदन
रत्नागिरी

मोकाट जनावरे, अंधारे रस्ते आणि पुसलेल्या साईड पट्ट्या; शहराच्या सुरक्षिततेसाठी वंचित बहुजन आघाडीचे नगर परिषदेला निवेदन

Gramin Varta
Last updated: September 17, 2026 12:29 pm
Gramin Varta
21 Views
Share

रत्नागिरी/ प्रतिनिधी : शहरातील रस्त्यांवर वाढलेली मोकाट जनावरे, बंद पथदिवे, रस्त्यांच्या दुतर्फा पुसलेल्या साईड पट्ट्या तसेच खड्डेमय अंतर्गत रस्ते या नागरी समस्यांकडे रत्नागिरी नगर परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना १५ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत मार्गांवर मोकाट जनावरे रस्त्याच्या मध्यभागी ठिय्या मांडून बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अचानक समोर येणाऱ्या जनावरांमुळे दुचाकीस्वारांसह पादचारी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले. मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करून त्यांची योग्य त्या गोशाळा अथवा निवारा केंद्रात रवानगी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या हा देखील शहरातील गंभीर प्रश्न असल्याचे संघटनेने म्हटले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने नियमानुसार निर्बीजीकरणासह आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

हे प्रश्न केवळ सुविधांशी संबंधित नसून नागरिकांच्या दैनंदिन सुरक्षिततेशी निगडित असल्याने प्रशासनाने त्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने निवेदनातून मांडली आहे. निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष राजेंद्र कृष्णा कांबळे, महासचिव बिपिन अजित आयरे, सल्लागार अजित लक्ष्मण जाधव, शहराध्यक्ष विनोद कांबळे तसेच सदस्य सुभाष कदम, सुरेश पवार आणि अशोक जाधव उपस्थित होते.

रस्त्यांच्या कडेला पांढऱ्या पट्ट्या पुन्हा आखण्याची मागणी

रत्नागिरी शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवरील दुतर्फा साईड पट्ट्यांचे (रोड मार्जिन मार्किंग) रंगकाम पुसले गेले आहे. पावसाळ्यात तसेच रात्रीच्या वेळी रस्त्याची सीमा आणि कच्चा भाग यांचा अंदाज न आल्याने वाहन घसरण्याचा धोका वाढतो. त्यामुळे प्रमुख रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना ठळक साईड पट्ट्या तातडीने आखण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

बंद पथदिव्यांमुळे सुरक्षेचा प्रश्न

शहरातील विविध प्रभागांमधील काही पथदिवे बंद असून काही दिवे अत्यंत मंद प्रकाश देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. रस्त्यांवर पुरेसा प्रकाश नसल्यामुळे रात्रीच्या वेळी मोकाट जनावरे किंवा रस्त्यावरील अडथळे वाहनचालकांच्या लक्षात उशिरा येतात. परिणामी अपघाताचा धोका वाढू शकतो. तसेच अंधाराचा गैरफायदा घेऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने बंद पथदिवे तातडीने दुरुस्त करून पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील खड्डेमय झालेल्या अंतर्गत रस्त्यांचे आवश्यक त्या ठिकाणी डांबरीकरण करून नागरिकांना सुरक्षित आणि सुकर वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राजापूर: जामदा धरण पुनर्वसनात १ हजार बोगस घरांचा संशय; SIT चौकशीची मनसेची मागणी

Gramin Varta
2 Min Read

खेडमध्ये बांधकाम साइटवरून पडून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन २४ तास सज्ज; ‘सेवा संकल्प अभियाना’तून थेट जनतेपर्यंत शासकीय सेवा

Gramin Varta
3 Min Read

Exploring the Transformative Waves in Modern Technology

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

जयगड मार्गावर खड्डा चुकवताना भीषण अपघातात दोघे जखमी, चालकावर ४ महिन्यांनी गुन्हा दाखल

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी: बाथरूममध्ये पाय घसरून पडलेल्या नाचणे येथील ८० वर्षीय वृद्धाचा उपचारापूर्वी मृत्यू

1 Min Read
रत्नागिरी

‘सेवा संकल्प अभियाना’ने तीन वर्षांच्या चिमुरडीला दिले नवे आयुष्य; दुभंगलेले ओठ आणि टाळूवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

2 Min Read
रत्नागिरी

एसटी प्रवासात आदलाबदल झालेली लाखोंच्या दागिन्यांची बॅग राजापूर पोलिसांच्या तत्परतेमुळे काही तासांत हस्तगत

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?