ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चिपळूण : कादवड येथे कौटुंबिक वादातून भावावर लाकडी दांडक्याने हल्ला; डोके फोडून जीवे मारण्याची धमकी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चिपळूण : कादवड येथे कौटुंबिक वादातून भावावर लाकडी दांडक्याने हल्ला; डोके फोडून जीवे मारण्याची धमकी
चिपळूण

चिपळूण : कादवड येथे कौटुंबिक वादातून भावावर लाकडी दांडक्याने हल्ला; डोके फोडून जीवे मारण्याची धमकी

Gramin Varta
Last updated: October 11, 2026 1:45 pm
Gramin Varta
182 Views
Share

चिपळूण: तालुक्यातील कादवड धनगरवाडी येथे कौटुंबिक वादातून एका तरुणाने आपल्याच सख्ख्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडका मारून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. बहिणीला घरात येण्यावरून जाब विचारल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आला असून, याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कादवड धनगरवाडी येथील रहिवासी संतोष बाबा वरक (वय ४८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा धाकटा भाऊ आरोपी रमेश बाबा वरक (वय ३०) हा खेड येथून कुलदैवताच्या दर्शनासाठी आपल्या दोन मुलांसह कादवड येथील घरी आला होता. त्यानंतर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांची बहीण विमल सचिन झोरे (रा. खोपी-शिरगाव, ता. खेड) ही देखील पाठोपाठ माहेरी आली. बहिणीला पाहताच रमेश वरक याने संतापून “तू इथे का आलीस, तू इथे यायचे नाही, हे घर माझ्या बापाचे आहे,” असे म्हणत तिला हटकले. त्यावर मोठे बंधू संतोष वरक यांनी मध्यस्थी करत “जसे हे तुझ्या बापाचे घर आहे, तसेच तिच्याही बापाचे आहे, ती येणारच,” असा जाब रमेशला विचारला.

या बोलण्याचा प्रचंड राग मनात धरून रमेश वरक याने घरातील लाकडी दांडका उचलून थेट संतोष वरक यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या हल्ल्यामुळे संतोष यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू झाला. त्यानंतर आरोपी रमेश वरक याने “तुम्ही माझ्या शेतीत पाय ठेवायचा नाही, नाहीतर तुम्हाला बघून घेईन,” अशी जीवे मारण्याची धमकी देऊन तिथून पोबारा केला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संतोष वरक यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले. या घटनेनंतर संतोष वरक यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी रमेश वरक याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५१(२) (तसेच भादंवि कलम ३२४, ५०६) अन्वये गुन्हा नोंदवला असून शिरगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitors :

5468418
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास होणार सुकर; गृहराज्यमंत्र्यांच्या पुढाकारातून ‘खेड-दिवा’ मेमू स्पेशल धावणार मोफत

Gramin Varta
2 Min Read

सावर्डे येथे २४ ऑक्टोबरला ‘मिनी नाईट प्रोमो रन’चे आयोजन

Gramin Varta
2 Min Read

सरकार पर्यावरणीय दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे : ॲड. असीम सरोदे

Gramin Varta
3 Min Read

‘लहरा दो तिरंगा’ यात्रेपूर्वी अभिजीत दिपके आणि नेहा बोरा पोलिसांच्या ताब्यात

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

चिपळूण

चिपळूण-संगमेश्वरमध्ये बिबट्या व माकड संगोपन केंद्र उभारणीच्या हालचालींना वेग

2 Min Read
चिपळूण

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेला सहकार प्रशिक्षण केंद्र म्हणून अधिकृत मान्यता; महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, पुणे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

2 Min Read
चिपळूण

पिंपळीतील दोन्ही पूल १५ जानेवारीपर्यंत वाहतुकीसाठी खुले होणार

2 Min Read
चिपळूण

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची शेतकऱ्यांच्या बांधावर दिवाळी; ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही!’

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?