ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास होणार सुकर; गृहराज्यमंत्र्यांच्या पुढाकारातून ‘खेड-दिवा’ मेमू स्पेशल धावणार मोफत
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास होणार सुकर; गृहराज्यमंत्र्यांच्या पुढाकारातून ‘खेड-दिवा’ मेमू स्पेशल धावणार मोफत
खेड

गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास होणार सुकर; गृहराज्यमंत्र्यांच्या पुढाकारातून ‘खेड-दिवा’ मेमू स्पेशल धावणार मोफत

Gramin Varta
Last updated: September 17, 2026 8:28 am
Gramin Varta
41 Views
Share

खेड: गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करून मुंबईच्या दिशेने परतणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुलभ, सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दिलासादायक व्हावा यासाठी यंदाही विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षी उत्सवानंतर कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळते आणि नियमित तसेच विशेष गाड्या धावत असल्या तरी तिकिटांचा अतिरिक्त खर्च अनेक कुटुंबांच्या खिशावर भार ठरतो. याच पार्श्वभूमीवर खेड, दापोली आणि मंडणगड विधानसभा मतदारसंघातील चाकरमान्यांच्या सोयीसाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहकार्यातून ‘खेड-दिवा’ अनारक्षित मेमू स्पेशल ही मोफत रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून, या निर्णयामुळे गणेशभक्तांमधून मोठे समाधान व्यक्त होत आहे.

परतीच्या गर्दीचे योग्य नियोजन करण्याच्या उद्देशाने ही विशेष अनारक्षित मेमू गाडी येत्या २० आणि २१ सप्टेंबर रोजी खेड रेल्वेस्थानकातून सायंकाळी ४ वाजता सुटणार असून, रात्री १० वाजता ती दिवा स्थानकावर पोहोचेल. या मोफत प्रवासाचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना पास घेणे अनिवार्य असून, प्रवासाच्या दोन्ही दिवशी दुपारी ३ वाजल्यापासून खेड रेल्वेस्थानकावरच हे मोफत पास वितरित केले जाणार आहेत. मतदारसंघातील जास्तीत जास्त गणेशभक्तांनी वेळेत रेल्वेस्थानकावर उपस्थित राहून या पासचा तसेच मोफत प्रवासाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

दरम्यान, या संपूर्ण उपक्रमाचे नेटके व्यवस्थापन आणि यशस्वी आयोजन करण्यासाठी शिवसेना तसेच राष्ट्रीय कर्मचारी सेना अंगीकृत रिक्षा सेनेचे पदाधिकारी सक्रीयपणे मैदानात उतरले आहेत. रेल्वेस्थानकावर प्रवाशांचे योग्य नियोजन करणे आणि पास वितरणाचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी शहरप्रमुख कुंदन सातपुते व उपनगराध्यक्ष सतीश चिकणे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी सहकार्य करणार आहेत. कोकणातील सण आटोपून पुन्हा आपल्या कर्मभूमीकडे निघालेल्या हजारो चाकरमान्यांना या उपक्रमामुळे मोठा आर्थिक आणि प्रवासाचा दिलासा मिळणार आहे.

Total Visitors :

5427461
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरीत आकाशप्रेमींनी अनुभवला अद्भुत खगोलीय सोहळा; चंद्रामागे लपला तेजस्वी शुक्र

Gramin Varta
1 Min Read

शहरात वाढलेल्या एका Gen Z तरुणाच्या नजरेतून गाव, माणसं आणि ‘घर’ शोधणाऱ्या ‘मॅगझिन’चा टीझर प्रदर्शित

Gramin Varta
3 Min Read

फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० वर संपर्क साधण्याचे सायबर पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांचे आवाहन

Gramin Varta
3 Min Read

११,५०० फुटांवर रत्नागिरीचा झेंडा; अभिजित पड्याळ यांची लडाख मॅरेथॉन ५ तास २२ मिनिटांत पूर्ण

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

खेड

खेड: भेलसई पुलावर मोटारसायकल कठड्यावर आदळली; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

2 Min Read
खेड

5 Ways to Manage Your spending on Multiple Credit Cards

7 Min Read
खेड

Apple Pay Celebrates Milestone: Surpasses X Billion Transactions Mark

7 Min Read
खेड

Unveiling the Current Shifts Reshaping the Global Technosphere

10 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?