ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चिपळूणमध्ये किरकोळ कारणावरून जावई व सासऱ्याला भररस्त्यात बेदम मारहाण; कोळकेवाडीतील चार जणांवर गुन्हा दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चिपळूणमध्ये किरकोळ कारणावरून जावई व सासऱ्याला भररस्त्यात बेदम मारहाण; कोळकेवाडीतील चार जणांवर गुन्हा दाखल
चिपळूण

चिपळूणमध्ये किरकोळ कारणावरून जावई व सासऱ्याला भररस्त्यात बेदम मारहाण; कोळकेवाडीतील चार जणांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
Last updated: September 22, 2026 12:12 pm
Gramin Varta
481 Views
Share

चिपळूण : चिपळूण येथील उक्ताड परिसरात भररस्त्यात दुचाकी अडवून जावयाला आणि मध्यस्थी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक सासऱ्याला बेदम मारहाण करत हातातील कड्याने डोळ्यावर वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात जावई गंभीर जखमी झाले असून, चिपळूण पोलिसांनी कोळकेवाडी येथील चार संशयित तरुणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उक्ताड येथील कालभैरव मंदिराजवळ राहणारे सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक सुभाष बाजी लोटेकर (वय ६४), त्यांचे जावई समीर काकडे, ड्रायव्हर कृष्णा काळे आणि क्लिनर ओंकार चव्हाण हे २० सप्टेंबर रोजी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास कालभैरव मंदिर ते गणेश मंदिर रस्त्याने जावयांच्या गाडीकडे चालत जात होते. ते रामभाऊ गोरीवले यांच्या घराजवळ पोहोचले असता, उक्ताडच्या दिशेने एका ॲक्टिव्हा (क्रमांक एम.एच. ०८ बी.ए. ४३७८) आणि बुलेट मोटरसायकलवरून (क्रमांक एम.एच. १२ एक्स.एस. ६१६४) चार तरुण आले. त्यांनी अचानक फिर्यादींचा रस्ता अडवून वाद घालण्यास सुरुवात केली.

त्यानंतर संशयित आयुष अनिल शिंदे, पार्थ राकेश शिंदे आणि आर्यन अनिल शिंदे यांनी फिर्यादींचे जावई समीर काकडे यांना हाताच्या चापटीने मारहाण करण्यास सुरुवात केली. आपल्या जावयाला वाचवण्यासाठी ६४ वर्षीय सुभाष लोटेकर मध्ये पडले असता, चौथा संशयित नितीन रामचंद्र शेळके याने लोटेकर यांच्या जोरात कानाखाली मारून त्यांना बाजूला ढकलून दिले. त्यानंतर आरोपींनी जावई समीर काकडे यांच्या डाव्या डोळ्याजवळ हातातील लोखंडी कड्याने जोरदार प्रहार करून त्यांना रक्तबंबाळ केले. तसेच सर्वांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेनंतर जखमींवर उपचार करण्यात आले असून, सुभाष लोटेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिपळूण पोलिसांनी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजून दहा मिनिटांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक २९५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ११५ (२), ११८ (१), १२६ (२), ३५२, ३५१ (३) आणि ३ (५) अन्वये कोळकेवाडी येथील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मध्यरात्री घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

जैतापूर येथे भरधाव कारची समोरून धडक; दोन्ही वाहनांचे नुकसान

Gramin Varta
1 Min Read

महाराष्ट्राचा ‘आदर्श नोंदणी पॅटर्न’ आता देशभरात लागू होणार; केंद्राकडून प्रत्येक कार्यालयासाठी ५० लाखांचे अनुदान जाहीर

Gramin Varta
3 Min Read

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तातही चिपळूण पोलिसांची कर्तव्यतत्परता; रिक्षाचालकाचा हरवलेला मोबाईल शोधून केला सुपूर्द

Gramin Varta
2 Min Read

देवरुख: आंबव हनुमान स्टॉपजवळ गांजा सेवन करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

चिपळूण

गरजू महिलांना स्वयंरोजगाराचे बळ; भाजप चिपळूण शहर मंडलातर्फे घरघंटी व शिलाई मशीनचे वाटप

3 Min Read
चिपळूण

चिपळूण रेल्वे स्थानकावर होमगार्डच्या प्रसंगावधानाने प्रवाशाचा जीव वाचला; युवासेनेकडून रोहित चिले यांचा सन्मान

2 Min Read
चिपळूण

खेर्डीत तालुकास्तरीय शालेय व खुली बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात

2 Min Read
चिपळूण

कमी पावसाने कोकणात भात-नाचणी पिके करपली; उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचे संकट

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?