ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: सावर्डे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन, शोध व बचाव प्रशिक्षण
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » सावर्डे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन, शोध व बचाव प्रशिक्षण
चिपळूण

सावर्डे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन, शोध व बचाव प्रशिक्षण

Gramin Varta
Last updated: September 25, 2026 8:09 am
Gramin Varta
2 Views
Share

७४२ विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षितता व बचावकार्याचे प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन

चिपळूण: आपत्तीच्या प्रसंगी घाबरून न जाता प्रसंगावधान राखणे, स्वतःचा बचाव करणे तसेच गरजेनुसार इतरांना मदत करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विद्यार्थ्यांना अवगत व्हावीत, या उद्देशाने सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे आपत्ती व्यवस्थापन, शोध व बचाव प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. राष्ट्रीय शाळा सुरक्षा धोरणांतर्गत जिल्हा परिषद शिक्षण विभाग, रत्नागिरी यांच्या वतीने राष्ट्रीय आपत्ती प्रशिक्षण संस्था, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण घेण्यात आले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण व पर्यवेक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रशिक्षणात युगंधरा महामुनकर यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन, शोध व बचावकार्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाचा लाभ विद्यालयातील तब्बल ७४२ विद्यार्थ्यांनी घेतला.

प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक माहिती न देता विविध बाबींची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. अपघातामध्ये एखाद्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाल्यास तिला सुरक्षितपणे कसे उचलावे, जखमी व्यक्तीला हलविताना कोणती खबरदारी घ्यावी, तसेच रुग्णाला उचलण्याच्या विविध पद्धती यांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले.

हात किंवा पायाला दुखापत झाल्यास जखमी व्यक्तीची काळजी कशी घ्यावी, दुखापत वाढू नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी आणि आवश्यकतेनुसार वैद्यकीय मदत कशी मिळवावी, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींचे स्वरूप, आपत्तीपूर्व तयारीचे महत्त्व आणि आपत्तीच्या वेळी स्वतःसह इतरांचा बचाव करण्याच्या पद्धती याबाबत माहिती देण्यात आली. तसेच आग लागल्यास घाबरून न जाता फायर एक्स्टिंग्विशरचा योग्य वापर कसा करावा, याचेही प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्तीच्या प्रसंगी प्रसंगावधान राखणे, सुरक्षितता जपणे आणि योग्य पद्धतीने बचावकार्य करण्याबाबत जागरूकता निर्माण झाली. आपत्ती आली तर घाबरायचे नाही, तर ज्ञान, कौशल्य आणि प्रसंगावधानाच्या जोरावर परिस्थितीचा सामना करायचा, हा महत्त्वपूर्ण संदेश या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना मिळाला.

Total Visitors :

5427461
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरी शहरात अमली पदार्थविरोधी कारवाई; हेरॉईनसदृश पदार्थासह दोघे ताब्यात

Gramin Varta
3 Min Read

दापोली : मुगीज कलमपेठ येथे बंद घर फोडून आठ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी: मुरुगवाड्यात विक्रीच्या उद्देशाने हेरॉईन बाळगणारा २२ वर्षीय तरुण ताब्यात

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरी: स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मच्छिमारांचे प्राण वाचवणाऱ्या ७ जणांचा सत्कार

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

चिपळूण

चिपळूण: पोट फुगून अचानक प्रकृती बिघडली; चिमुकलीचा रुग्णालयात मृत्यू

1 Min Read
चिपळूण

८ चुलते, ७२ माणसे अन् ३५ वर्षांची परंपरा; दोणवली बामणेवाडीतील कदम कुटुंबीयांच्या सामूहिक गणेशोत्सवात तीन पिढ्यांचा संगम

2 Min Read
चिपळूण

सावर्डेत प्रथमच ‘कार्डिओ-डायबेटिक क्लिनिक’चा शुभारंभ

1 Min Read
चिपळूण

Apple’s iPhone Revolution Takes a Green Turn with Sustainable Materials

7 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?