ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चिपळूणमध्ये भाजपची मोठी राजकीय मुसंडी; मार्कंडी, शंकरवाडी व ओझरवाडीतील शेकडो तरुणांचा पक्षात जाहीर प्रवेश
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चिपळूणमध्ये भाजपची मोठी राजकीय मुसंडी; मार्कंडी, शंकरवाडी व ओझरवाडीतील शेकडो तरुणांचा पक्षात जाहीर प्रवेश
चिपळूण

चिपळूणमध्ये भाजपची मोठी राजकीय मुसंडी; मार्कंडी, शंकरवाडी व ओझरवाडीतील शेकडो तरुणांचा पक्षात जाहीर प्रवेश

Gramin Varta
Last updated: October 13, 2026 9:54 am
Gramin Varta
73 Views
Share

चिपळूण: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विजयानंतर चिपळूण शहरात भारतीय जनता पार्टीने पक्षविस्ताराचा झंझावात कायम राखला असून मार्कंडी, शंकरवाडी तसेच ओझरवाडी परिसरातील असंख्य तरुण कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजप नगरसेवक तथा अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप भिसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून आणि प्रयत्नांतून हा पक्षप्रवेश घडवून आणण्यात आला असून, रविवारी सायंकाळी स्वामींनी निवासस्थानी आयोजित विशेष सोहळ्यात रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी सर्व नवप्रवेशी तरुणांचे पक्षात स्वागत करून त्यांना योग्य सन्मान व जबाबदारी देण्याची ग्वाही दिली.

वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्याकडे रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याची धुरा आल्यानंतर त्यांनी तालुक्यात पक्षसंघटन बळकट करण्यावर भर दिला होता. नगरपरिषद आणि जिल्हापरिषद निवडणुकांमध्ये पक्षाने मिळवलेले नेत्रदीपक यश त्यांच्या संघटनकौशल्याची पोचपावती ठरले असून, आता पक्षाची ध्येयधोरणे आणि विकासकामांवर विश्वास ठेवून तरुण वर्ग मोठ्या संख्येने भाजपकडे आकर्षित होत आहे. नगरसेवक संदीप भिसे यांनी शहरात उभे केलेले मजबूत युवा नेटवर्क आणि प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर निष्ठा व्यक्त करत स्थानिक तरुणांनी हा राजकीय निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

या पक्षप्रवेश सोहळ्याला उपनगराध्यक्षा रूपाली दांडेकर, गटनेते शशिकांत मोदी, जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य स्वप्ना यादव, आरोग्य सभापती शुभम पिसे, महिला व बालकल्याण सभापती रसिका देवळेकर, चिटणीस अनिल सावर्डेकर, स्वानंद रानडे, जतिन घटे, अर्बन बँक संचालक रत्नदीप देवळेकर, मंडल उपाध्यक्ष नरेंद्र बेलवलकर, राकेश दाते, चव्हाण, अभिषेक साळुंखे, सर्वेश सुर्वे, दिनेश लटके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी रवींद्र तटकरे, पप्पू चौगुले, राम चौगुले, श्रीराम गोलमाडे, अविनाश तटकरे, संतोष जाधव, विजय यादव, हनुमान शिंदे, हरीश मोहिते, विलास राठोड, शेखर गोदीस, बाळू शिंदे, हेमंत दाभाडे या प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो तरुणांनी हातात कमळ घेत पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरातील या मोठ्या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद अधिक भक्कम मानली जात आहे.

Total Visitors :

5470309
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूण तालुक्यात राष्ट्रवादी व भाजपला मोठा राजकीय धक्का; असंख्य कार्यकर्त्यांचा मनसेत जाहीर प्रवेश

Gramin Varta
1 Min Read

राज्यस्तरीय डिजिटल सजावट स्पर्धेत साईराज शिंदेची बाजी; मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्र्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र पटकावून जाकादेवी महाविद्यालयाचा गौरव

Gramin Varta
1 Min Read

३२ वर्षे ज्ञानदान करणाऱ्या दिव्यांग शिक्षकाला हक्काच्या बिलासाठी चिपळूण पंचायत समितीत वणवण; शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Gramin Varta
2 Min Read

राजापूर : तळवडे गावात ठाकरे गट-भाजपला धक्का; शेकडो ग्रामस्थांचा शिंदे सेनेत प्रवेश

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

चिपळूण

चिपळूण : मांडकी खांबेवाडी येथे दोन घरे फोडून चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह ३६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

2 Min Read
चिपळूण

चिपळूण नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेवरील मेहता पेट्रोल पंपाच्या ताब्याची चौकशी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे थेट आदेश

1 Min Read
चिपळूण

गणेश चतुर्थीपूर्वी चिपळूणचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार

2 Min Read
चिपळूण

चिपळुण : ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट दुकान फोडून १ लाख ४ हजारांचे सामान लंपास

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?