ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राजापूर: अल्पवयीन अत्याचारप्रकरणी मुख्य संशयिताची बालसुधारगृहात रवानगी; २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन आदेश
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Saturday, Sep 26, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राजापूर: अल्पवयीन अत्याचारप्रकरणी मुख्य संशयिताची बालसुधारगृहात रवानगी; २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन आदेश
राजापूर

राजापूर: अल्पवयीन अत्याचारप्रकरणी मुख्य संशयिताची बालसुधारगृहात रवानगी; २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन आदेश

Gramin Varta
Last updated: September 15, 2026 11:05 am
Gramin Varta
41 Views
Share

राजापूर : अल्पवयीन युवतीवर अत्याचार करून त्याचे चित्रीकरण केल्याचा तसेच संबंधित व्हिडीओ प्रसारित केल्याचा गंभीर प्रकार राजापूर परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणातील मुख्य अल्पवयीन संशयिताला जिल्हा बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याची २२ सप्टेंबरपर्यंत बालसुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून झालेल्या ओळखीतून संशयिताची पीडित अल्पवयीन युवतीशी मैत्री झाली होती. त्यानंतर त्याने तिला राजापूर शहराजवळील कोंदवली-साईनगर परिसरातील एका लॉजवर नेल्याचा आरोप आहे. तेथे तिच्यावर अत्याचार करून त्याचे चित्रीकरण करण्यात आले. त्यानंतर संबंधित व्हिडीओ इतर व्यक्तींपर्यंत पोहोचवून प्रसारित करण्यात आल्याने पीडितेची बदनामी झाल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली.

१९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रार प्राप्त होताच राजापूर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपासाची दिशा निश्चित करत मुख्य अल्पवयीन संशयिताला शुक्रवारी जिल्हा बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने त्याची २२ सप्टेंबरपर्यंत बालसुधारगृहात रवानगी केली.

दरम्यान, अत्याचाराच्या घटनेनंतर संबंधित व्हिडीओ प्रथम कोणाच्या मोबाईलवर पाठवण्यात आला आणि त्यानंतर तो कोणाकडून पुढे प्रसारित करण्यात आला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या तपासादरम्यान आणखी चार संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. संबंधित संशयितांकडील मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ते तांत्रिक तपासणीसाठी सायबर शाखेकडे पाठवण्यात आले आहेत.

व्हिडीओच्या प्रसारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच हा व्हिडीओ आणखी किती जणांपर्यंत पोहोचला आहे, याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा सखोल तपास राजापूर पोलिसांकडून सुरू असून, तपासातून आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Total Visitors :

5428503
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

देवरुख: आंबव हनुमान स्टॉपजवळ गांजा सेवन करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

Future Changes Shape: Express Yourself with Galaxy Z Flip

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

रत्नागिरीत ७ ग्रॅम ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ जप्त; दोघांवर एनडीपीएसअंतर्गत गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात रत्नागिरीचे प्रथमेश गवाणकर उच्च न्यायालयात; कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

राजापूर

जमिनीच्या वादातून राजापुरात वृद्ध महिलेवर प्राणघातक हल्ला; मारहाण करून फळझाडांची केली तोडफोड, ६ जणांवर गुन्हा

2 Min Read
राजापूर

नाटे परिसरात भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

1 Min Read
राजापूर

Tech-Powered Future Updates on the Frontlines of Change

Sponsored by
राजापूर

Exploring Intelligent Solutions for a Smart Approach to Skincare

7 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?